संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी, आनंदवाडी, जावळेवस्ती व ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २८७ विद्यार्थ्यांना आमदार अमोल खताळ यांच्या जन्मदिवसानिमित्त शालेय साहित्य मिळाल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला हार-गुच्छ या खर्चाला फाटा देत शालेय साहित्य आणण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी वह्या व इतर शाळा ऊपयोगी साहित्य भेट म्हणून आणले होते. सर्व शालेय साहित्य आमदार अमोल खताळ यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावातील गोरगरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वाटप केले.



त्याचाच एक भाग म्हणून चंदनापुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेले शालेय साहित्य आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे, युवासेना प्रमुख सुशील शेवाळे विलास सरोदे व अमोल रहाणे यांनी स्व खर्चातून वह्या व इतर शालेयपयोगी साहित्य खरेदी करून जिल्हा परिषदेच्या चंदनापुरी,आनंदवाडी,जावळेवस्ती व ठाकरवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना वितरित केले.
यावेळी हे साहित्य शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, भाजपचे राज्य कार्यकारणी सदश्य दादाभाऊ गुंजाळ, भाजपचे डॉ. अभय बंगाळकर, माजी सरपंच रोहिदास राहणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे, आंबेडकर पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र राहणे, कामगार पोलीस पाटील ज्ञानदेव राहणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सुरेश रहाणे, सीताराम रहाणे, बाळासाहेब सरोदे, विलास सरोदे, शरद सरोदे, रावसाहेब सातपुते, विलास रहाणे, विकास रहाणे, सुनील रहाणे, रामचंद्र सरोदे, बाळकृष्ण सरोदे, अमोल रहाणे, सुरेश रहाणे, मधुकर रहाणे, दादाभाऊ शिरतार, जय मल्हार ग्रुप चंदनापुरी, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.