संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना येथील अमृतेश्वर मंदिर प्रांगणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते मा.आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.२५ जुलै ते शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.

वै. स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य ह.भ.प रामभाऊ महाराज गावडे यांचे प्रेरणेने व ह.भ.प. गुरुवर्य कलामाई यांचे कृपाशिर्वादाने व ह.भ.प.गोविंद महाराज करंजकर तसेच ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे यांचे मार्गदर्शनाखाली सलग ४० व्या वर्षी या सप्ताहाचे आयोजन होत आहे.
या सप्ताहाची घटस्थापना शुक्रवार दि.२५ जुलै रोजी सकाळी ९ वा पांडुरंग घुले व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई पांडुरंग घुले यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकड भजन,सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन,सायं.४.३० ते ५.३० सामु.हरिपाठ, सायं.५.३० ते ६.३० ज्ञानेश्वरी प्रवचन,सायं ७ ते ९ हरिकिर्तन नंतर हरिजागर होणार आहे.
यामध्ये शुक्रवार दि.२५ जुलै ते शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ह.भ.प.अरुण महाराज फरगडे संपूर्ण सप्ताह काळात दररोज ज्ञानेश्वरी अध्याय प्रवचन सेवा देणार आहे. शुक्रवार दि.25/7/2025 रोजी ह.भ.प.सुनील महाराज मंगळापुरकर (मंगळापूर),शनिवार 26 ह.भ.प. अरुण महाराज फरगडे ( निमगाव पागा ),रविवार दि.27 ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील ( कल्याण ) सोमवार दि. 28 ह.भ.प.राजेंद्र महाराज ढोन्नर ( समशेरपुर ) मंगळवार दि.29 ह.भ.प. गोविंद महाराज करंजकर ( अंबाजोगाई ), बुधवार दि.30 ह.भ.प.भागवत महाराज बादाडे ( बीड ) व गुरुवार दि.31 ह.भ.प.मदन महाराज वर्पे ( चिकणी ) यांचे कीर्तन सेवा होणार होणार असून शुक्रवार दिनांक 1/8/2025 रोजी सकाळी 9. ते 11 कथा प्रवक्ते व कीर्तनकार ह.भ.प ॲड.शंकर महाराज शेवाळे ( पुणे ) यांचे काल्याचे कीर्तन व सोहळ्याची सांगता होईल.
गुरुवार दि.३१/७/२०२५ रोजी सायं.६.३० कारखान्याचे चेअरमन लोकनेते मा.आमदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. असून यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे,आ.सत्यजीत तांबे,इंद्रजितभाऊ थोरात,डॉ.जयश्रीताई थोरात यांचे सह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,कार्याध्यक्ष,सेक्रेटरी,खजिनदार व सांस्कृतिक मंडळाच्या सर्व संचालकांनी केले आहे.