संगमनेरचे सुपुत्र वीर जवान संदीप किसन घोडेकर हे देशासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आले. शहीद मेजर संदीप घोडेकर यांचे देशवासीयांना सदैव स्मरण राहील असे अभिवादन मा.महसूल मंत्री तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.



घोडेकर मळा येथे वीर जवान संदीप किसन घोडेकर यांच्या कुटुंबीयांची मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन वीरपत्नी वर्षा संदीप घोडेकर व मुलगा यश संदीप घोडेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी समवेत मा. नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, राजेश वाकचौरे गजेंद्र अभंग, गणेश मादास , भाऊ गणेश किसन घोडेकर, भगवान घोडेकर ,दिलीप म्हसे, सदाशिव घोडेकर, तुषार घोडेकर, नवनाथ आरगडे, जीवन पांचारिया, अनिल घोडेकर, सुनील घोडेकर, आदी उपस्थित होते.
यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वीर जवान संदीप यांनी शिक्षण घेतले असून देशसेवेचे व्रत हाती घेतले. सैनिक सीमेवर रात्रंदिवस पहारा करत असतो. जेव्हा देशवासीय सण, परंपरा साजरी करत असतात तेव्हा हे जवान आपल्या घरापासून दूर असतात. सीआरपीएफ दिल्ली येथे कार्यरत असलेले जवान संदीप यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.
संगमनेरच्या सुपुत्राने देशाकरता दिलेले हे बलिदान असून त्यांचे योगदान हे संगमनेरकरांच्या आणि देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. याचबरोबर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकोले नाका या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे याकरता नगरपालिकेकडे जागेची मागणी केली असून शहिदांचे स्मारक व्हावे यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. एवढी घोडेकर मळा परिसर व शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी शहीद संदीप घोडेकर यांना अभिवादन केले