संगमनेर – गटार दुर्घटना प्रकरणांमध्ये मयत झालेले अतुल पवार व जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी ही सर्व संगमनेरकरांची एकमुखी मागणी आहे. यासाठी सरकारने किंवा नगरपालिकेने मयत कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली होती यानुसार नगरपालिकेने नियमाप्रमाणे आणि जबाबदारीने नगरपालिका नफा फंडा मयत अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये असून नवीन लोकप्रतिनिधींनी याचे श्रेय घेऊ नये असे आवाहन शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केले आहे.

सोमेश्वर दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हेवाडी रोड येथे झालेल्या गटार दुर्घटनेमध्ये अतुल पवार व त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या जावेद पिंजारी यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण संगमनेर शहर व तालुका हळहळला. या दोन्ही मृत युवकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत मिळावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली तर यांना मदत मिळावी याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सुद्धा पाठपुरावा करत आहे.
संगमनेर नगरपालिकेने कायम शहरातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे मयत पवार व पिंजारी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरता नगरपालिका मुख्याधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून नगरपालिका प्रशासनाने जबाबदारीने आणि शासनाचा नियमाप्रमाणे नगरपालिका नफा फंडातून मयत अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत मिळाली आहे. यामध्ये नवीन लोकप्रतिनिधीचे कोणतेही योगदान नाही.
नेहमीप्रमाणे प्रसिद्धीसाठी बातमी देणे आणि सोशल मीडियावर जाहिरात बाजी करणे हे त्यांनी केले आहे यामध्ये त्यांचे कोणतेही योगदान नसून ही मदत नगरपालिका नफा फंडातून म्हणजे संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने दिलेली आहे. ही चांगली गोष्ट असून याची कोणीही राजकारण करू नये . मात्र नवीन लोकप्रतिनिधीने जाहिरात बाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
तसेच मयत जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही नगरपालिकेकडून मदत मिळावी व अतुल पवार यांच्याही कुटुंबीयांना भरीव मदत मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा असे आवाहन सोमेश्वर दिवटे यांनी केले आहे.