संगमनेर तालुक्यातील एका इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता 6 वी मधील विध्यार्थी पार्थ जगदीश वाकळे व प्रीत जगदीश वाकळे या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वरमध्ये निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

विशेष बाब म्हणजे हे दोघेही जुळी भावंड असून त्यांना 100 गुणांपैकी 96.25 असे एकसारखे मार्क्स मिळालेत तर जिल्ह्यात मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे.या परीक्षेसाठी एकूण 23 हजार विद्यार्थी बसले होते त्यामधून 80 विद्यार्थी यासाठी पात्र झाले आणि त्यात पार्थ-प्रीत यांनी हे घवघवीत आणि नेत्रदीपक यश संपादन केलंय या बद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून अभिनंद होत आहे.


संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनीही या वाकले बंधूंचं अभिनंदन केलं असून आपल्या तालुक्याचे नाव असेच पुढे घेऊन जावो असे गौरवोद्गार काढत शुभेच्छा दिल्यात. तसेच याआधी देखील वाकळे बंधूंनी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत देखील त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची प्रगती अशीच सुरू रहावी याबद्दल त्यांना त्यांच्या मार्गदर्शकांनी शुभेच्छा दिल्यात.