त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आमदार अमोल खताळ यांचे मुख्याधिकारी व पोलिसांना निर्देश

संगमनेर – कोल्हेवाडी रोडवरील STP गटार सफाईचे काम सुरू असताना कर्मचारी अतुल रतन पवार हे मयत झाले असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित कामाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मयत झालेल्या पवार कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही आहोत तसेच दवाखान्यात उपचार घेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा खर्च नगरपालिका प्रशासनाने करावा असे प्रशासनास सांगितलेले आहे.


मयत पवार कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाकडून मिळवून देऊ. या घडलेल्या घटनेस दोषी असलेल्या भूमिगत गटाराच्या मुळ ठेकेदारासह मुश्ताक शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी व पोलिस अधिकारी यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *