देशातील पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी म्हणून सी न्यूज चॅनेलची ओळख आहे.
सन 2000 मध्ये सुरु झालेली हि वृत्तवाहिनी केबलद्वारे सर्वदूर पोहोचली गेल्याने सर्वांचीच मोठी पसंती सी न्यूजला मिळाली. व्हीसीआर पासून सुरु झालेला प्रवास आज थेट इंटरनेट आणि सोशल माध्यमांपर्यंत येऊन पोहोचला असून या सर्व प्रवासात असंख्य दर्शक, प्रेक्षक, जाहिरातदार, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या मदतीमुळे सी न्यूज वृत्तवाहिनी आता सी न्यूज मराठी नावाने प्रचलित असून या माध्यमातून आजही केबलद्वारे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये DEN केबलद्वारे 24×7 प्रसारित होणारी हि एकमेव वृत्तवाहिनी आहे. स्थानिक कार्यक्रम, जनजागृती, जाहिराती, बातम्या, माहितीपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हि वृत्तवाहिनी आजही विश्वासार्ह, प्रामाणिक म्हणून प्रचलित आहे. सी न्यूज मराठी चॅनेलचे सर्व प्रतिनिधी, कॅमेरामन आणि कार्यालयीन कर्मचारी जनतेच्या समस्या मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. आपले सर्वांचे सहकार्य असेच कायम असू द्या.
अधिक माहितीसाठी
गोरक्षनाथ मदने – संचालक, संपादक
बाळासाहेब गडाख – संचालक
CALL – 8669040880 / 8007358045