आज मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात श्रीगोंदा नगर विधानसभेतील प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व श्रीगोंदा नगर विधानसभेचे आमदार श्री. विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या वेळी श्रीगोंदा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. सुभाषराव काळाने, बेलवंडीचे माजी सरपंच श्री. उत्तम डाके, तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच श्री. संजय निगडे, माजी सरपंच देविदास भोस, तसेच मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बंडू नामदेव मांडे यांच्यासह बेलवंडी व तांदळी दुमालातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी जिल्ह्यातील तसेच श्रीगोंदा नगर विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
- आमदार विक्रम पाचपुते म्हणाले,
“भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. श्रीगोंदा नगर विधानसभेतील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. भविष्यातही असेच अनेक नेते भाजपामध्ये सामील होतील, असा मला विश्वास आहे.”