महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे.आज निवडणुकांचा तारखांची घोषणा झाली असल्याने आजपासूनच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होणार आहे. अशा परिस्थितीत या तारखे आधीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापित होणे अपेक्षित आहे.याच अनुषंगाने आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट तसेच महायुती मधील भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आणि स्वराज्य पक्ष हे देखील आपले उमेदवार उतरवणार आहेत.