भारताचे महान उद्योजक स्व. रतन टाटा यांचा आदर्श डोळ्यासमोर आदर्श उद्योजक व सुजान नागरिक व्हावे रतन टाटांच्या विचार कर्म संसाराची बिज विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अग्नीपंख फौंडेशनने रतन टाटा यांच्या 87 व्या जयंतीचा उत्सव साजरा केला. यातुन निश्चित भविष्यात विद्यार्थ्यांतून उद्योजकांची बाग फुलेल असा विश्वास राष्ट्रपती पारितोषिक विजेते अंध उद्योजक डॉ. भावेश भाटीया यांनी श्रीगोंदा येथे आयोजीत केल्या आकाशी झेप घे पाखरा या विषयावर पुष्प गुंफताना व्यक्त केला.
यावेळी अग्नीपंख फौंडेशनने डॉ. भावेश भाटीया यांना जीवन गौरव पुरस्कार व 25 हजाराची मदत अंध मित्रांच्या उन्नतीसाठी दिली. तसेच शुन्यातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या 22 उद्योजकांना बेस्ट बिझनेमन अवार्ड प्रदान करण्यात आले. अध्यक्षपदी उद्योजक प्रकाश कुतवळ होते. प्रतिभा कुरुमकर यांनी रतन टाटा यांचा फोटो असलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. प्रतिक्षा लोखंडे व जामखेड बाल निवारा केंदास मदत केली.
डॉ. भावेश भाटीया पुढे म्हणाले की मला बालपणी अंधत्व आले. मी शाळेत जाऊ लागलो त्यावेळी आई म्हणाली.. भावेश बाळा तुला जरी जग दिसत नाही खरे आहे पण तु जीवनात असे कर्म कर कि ज्यांना डोळे आहेत ते तुझे कर्म पाहतील आणि तुझ्या कर्माचा इतिहास लिहला जाईल. आईच्या दोन ओळीचा प्रभाव माझ्या जीवनावर पडला आहे. विद्यार्थी युवकात मोठी ऊर्जा आहे फक्त हिम्मतीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे.

दोन्ही डोळ्यांनी असलेले अंध उद्योजक भावेश भाटीया हे आपणासाठी आयडाॅल आहे. अग्नीपंख फौंडेशन ग्रामीण भागात आणून विद्यार्थ्यांसाठी राजमार्ग दाखवत हे कौतुकास्पद आहे. यावेळी उद्योजक जयकुमार मुनोत, संजय मचे, प्रिती रासकर, विशाल जाधव, विद्यार्थीनी पुर्वा रणसिंग यांची भाषणे झाली. प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले.
यावेळी निता भाटीया, विश्वनाथ दारकुंडे, डी डी भुजबळ, अमोल नागवडे, प्रशांत गोरे, एस पी कोंथिबीरे, अंकुश घाडगे, नवनीत मुनोत, राहुल कोठारी, मयुर गोरखे, विजया लंके, भाऊसाहेब डांगे, मदन गडदे उपस्थित होते. सुत्रसंचालन चंद्रशेखर पाटील व विशाल चव्हाण यांनी केले तर आभार गोपाळ डांगे यांनी मानले.
यावेळी जयकुमार मुनोत बेलवंडी, भास्कर गावडे निंबवी, संजयकुमार मचे घोडेगाव, मधुकर शिंदे घारगाव , राजाराम शिंदे पिंपळगाव पिसा, सुदाम झराड बेलवंडी कोठार, सुभाष गांधी आढळगाव, नंदकुमार गाडेकर, शिरसगाव बोडखा, प्रिती रासकर – रायकर हंगेवाडी, लखन नगरे लोणीव्यंकनाथ, महेश जाधव काष्टी, योगेश जाधव अजनुज, अविनाश गव्हाणे घुटेवाडी, सुदाम कोंथिबीरे श्रीगोंदा, शंकरराव वाळके उख्खलगाव, सर्जेराव धावडे येळपणे, भुजंग कांबळे बाबुर्डी, तात्या लखे लिंपणगाव, गणेश गुगळे भानगाव, रणजीत भोयटे सांगवी ,संतोष बोरुडे घोगरगाव, राजेंद्र झेंडे चिखली यांचा सन्मान केला गेला.
प्रतिनिधी – गणेश कविटकर, श्रीगोंदा