संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. तालुक्यात युवाशक्ती भगव्या खाली एकवटत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर येथे नुकतीच शिवसेनेची युवक निर्धार बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शशिकांत (लाला) दायमा, अजित भारते, अनिरुद्ध वाल झाडे, ओंकार शिंदे,ओंकार जंगम, विजय वालझाडे, अजय वालझाडे, आदित्य जोर्वेकर, सौरभ वाकचौरे, रोहित भारती, मोहिज अत्तार, अक्षय संस्कर, शुभम क्षत्रिय यांच्यासह अन्य ५० ते ६० युवक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत भगवा हातात घेतला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
आ. खताळ पुढे म्हणाले.. काही दिवसांपूर्वी संगमनेर खुर्द येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्या पाठोपाठ विविध गावातील शहराच्या विविध उपनगरातील युवक कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढील काळातही अनेक युवक कार्यकर्ते शिव सेनेत प्रवेश करणार आहे लवकरच शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर कार्यक्रम होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.