संगमनेर महायुती आणि आमदार अमोल खताळ पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बस स्थानकावर एकत्रित येत अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना कॅण्डल मार्च काढत श्रद्धांजली अर्पण केली.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान अचानक कोसळले या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह अडीचशे ते तीनशे जणांचा होरफळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संगमनेर महायुती तसेच आमदार अमोल खताळ पाटील युवा मंचचे सर्व कार्यकर्ते बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले, सर्वांनी मेणबत्ती पेटवून कॅण्डल मार्च काढत भावपूर्ण आदरांजली वाहिली.