अनिल देशपांडे यांनी दिली पसायदान वाचनालयास ४०० पुस्तके भेट

संगमनेर साहित्य परिषद गेली दहा वर्षे साहित्य क्षेत्रात उत्तम कार्य  करीत आहे. संगमनेर साहित्य परिषदेचे पसायदान वाचनालय आहे. या वाचनालयास आजपर्यंत अनेक साहित्यिक आणि वाचकांनी ग्रंथदान केले आहे. त्यामुळे पसायदान वाचनालयात अनेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तके संग्रही आहेत आणि वाचक त्याचा लाभ घेत आहेत.

पुस्तके दान केल्याने गरजू लोकांना चांगली पुस्तके वाचायला मिळतात, ज्यामुळे त्यांचे ज्ञान वाढते.जुनी आणि दुर्मिळ पुस्तके दान केल्याने सांस्कृतिक वारसा जतन होतो. अनेक परिवारात पुस्तके खरेदीनंतर अथवा वाचनानंतर तशीच पडून असतात. अशावेळी हि पुस्तके वाचनालयास भेट देणे चांगले. अजुनही वाचक वर्ग जुनी, नवीन पुस्तके वाचण्यास उत्सुक आहे आणि अशावेळी अशी पुस्तके वाचनालयात उपलब्ध झाली तर खूपच सोयीचे.  
          संगमनेर येथील प्रसिद्ध लेखक,कवी आणि व्याख्याते अनिल देशपांडे यांनी ४०० पुस्तके संगमनेर साहित्य परिषदेच्या पसायदान वाचनालयास भेट दिली.  त्यांनी पुस्तके भेट देताना या पुस्तकांचा वाचकांनी जरूर लाभ घ्यावा आणि पुस्तके वाचावीत असे आवाहन केले आहे. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, सौ.पुष्पाताई नि-हाळी, विजय दीक्षित, बाळकृष्ण महाजन, ज्ञानेश्वर राक्षे हे उपस्थित होत. परिषदेचे सचिव ज्ञानेश्वर राक्षे यांनी अनिल देशपांडे यांचे आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *