अभूतपूर्व जल्लोषात आमदार थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ

साहसी खेळ, हरी नामाचा गजर,आदिवासी नृत्य ,ढोल ताशांचा गजर, कांबड नृत्य, तारपा नृत्य अशी महाराष्ट्राची विविधतेची संस्कृती दाखवणाऱ्या जल्लोष्मय कार्यक्रमात आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ अर्पण केला असून तालुक्यातील जनतेला त्रास देणाऱ्या प्रवृत्तीला व खबऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे सांगताना काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू असा इशाराही दिला आहे.
खांडगाव येथील खंडेश्वर मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी छोटेखाणी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मा आमदार डॉ सुधीर तांबे, ॲड माधवराव कानवडे, देवस्थानचे अध्यक्ष लहान भाऊ पा.गुंजाळ, सौ दुर्गाताई तांबे , डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी ,ॲड मधुकर गुंजाळ, पांडुरंग घुले ,संपतराव डोंगरे, आर. बी राहणे , शिवसेनेचे अमर कतारी ,सौ अर्चनाताई बालोडे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे , मिलिंद कानवडे आदींसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, 1978 पासून खांडेश्वराच्या चरणी नारळ अर्पण करून प्राचाराची सुरुवात करण्याची आपली पद्धत आहे. परमेश्वरासह जनतेचा आशीर्वाद यामुळे सातत्याने मोठे यश मिळाले आहे .यावेळची निवडणूक अनेक कारणांमुळे गाजली आहे. जनतेच्या आशीर्वाद पक्ष नेतृत्वाचा विश्वास यामुळे सर्वोच्च पदावर असताना जास्त त्रास काही लोक देण्याचा प्रयत्न करत आहे. मागील अडीच वर्षात तालुक्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. चांगली घडी विस्कटित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले .अनेक सभा घेतल्या.


धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी होती. समस्त महिला भगिनींचा अपमान करणारी होती. या सभेनंतर तालुक्यातील महिलांचा उद्रेक झाला आणि तो त्यांनी अनुभवला. राजकारणात तत्वज्ञानावर बोला मात्र खालच्या पातळीचे राजकारण संगमनेर तालुका कधी सहन करणार नाही. देशमुख तर दोषी आहेच पण त्या स्टेजवर बसलेले आणि त्याला समर्थन करणारे सर्व त्या घटनेला जबाबदार आहेत. तालुक्यात मागील अडीच वर्षात अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकल्या. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . गोर गरिबांच्या अण्णात माती कालावण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांच्या पाठीशी हा प्रमुख खब- या आहे. आता त्याला त्याची जागा दाखवा.
आपण राज्यामध्ये सर्वाधिक काळ महसूल मंत्री राहिलो महसूल मंत्रीपदाचे एक स्टेटस असते. मात्र सध्याच्या मंत्र्यांनी त्या पदाचे महत्त्व फार कमी केले. कनोली ,मनोली ,कनकापूर मध्ये फिरणाऱ्या या मंत्र्यांनी पार कोतवालाला फोन केले.
राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकवटले आहेत. ही निवडणूक चांगली सांभाळा, राज्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन संगमनेर तालुका काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे हे संपूर्ण राज्याला दाखवा असे सांगताना संगमनेर तालुका शांत, सुसंस्कृत आहे. आम्ही कुणावर दादागिरी करत नाही. कुणाची दादागिरी सहन करत नाही. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही आणि जर वाटेला गेलो तर पुरता कार्यक्रम करू असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी नवनाथ आरगडे, मोहन गुंजाळ, सुभाष गुंजाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ यांनी केले तर मोहन गुंजाळ यांनी आभार मानले.
यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *