संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे मका तोडण्यासाठी गेलेल्या योगिता पानसरे या बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावल्या. सदर महिलेच्या कुटुंबियांची काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्याचबरोबर या परिसरातील ही तिसरी घटना असून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड दहशत असून अशा नरभक्षक बिबट्याला शूटच केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

देवगाव येथे मयत सौ योगिता पानसरे यांच्या कुटुंबियांची विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. यावेळी प्रकाश कोटकर, पोलीस पाटील अजय पावसे,दिनेश बांगर,रमेश रोहम, लहानु कोटकर, पोलीस पाटील रमेश वर्पे , सरपंच अर्चनाताई लामखडे, सरपंच नानासाहेब वर्पे, आदीसह गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगिता पानसरे या घराजवळ आपल्या शेतात मका तोडण्यासाठी गेल्या होत्या यावेळी बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजतात आमदार बाळासाहेब थोरात यांनी वन विभागाला तातडीने मदतीच्या सूचना दिल्या तसेच या परिसरातील ही तिसरी घटना असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्यामुळे त्या बिबट्याचा बंदोबस्त करा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.यावेळी आमदार थोरात म्हणाले की सध्या मानवी वस्तीमध्ये होणारे बिबट्यांचे हल्ले चिंताजनक आहे . या परिसरातील ही तिसरी घटना असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको ही केला आहे वनमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने शूट करावे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील यांच्यासह वन विभागाचे सर्व अधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.