राज्यामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले असून शिर्डी मतदारसंघांमध्ये मविआचा उमेदवार सौ.प्रभावती घोगरे यांनी ग्रामीण भागात घेतलेल्या संवाद फेऱ्यांना नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिर्डीमध्ये परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.
शिर्डी मतदारसंघातील निर्मळ पिंपरी, खडकेवाके, पिंपळस, दहेगाव ,केलवड ,पिंपरी लोकाई, या विविध गावांमध्ये सौ प्रभावती घोगरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी हजारो नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
याप्रसंगी निर्मळ पिंपरी सह विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना सौ.घोगरे म्हणाल्या की, माझी उमेदवारी ही सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी आहे. एकेकाळी राहता तालुका हा पेरूच्या बागांमुळे समृद्ध होता. 35 वर्षे ज्यांच्या घरात सत्ता आहे त्यांनी ठोस विकासाचे कोणतेही काम केले नाही. गावोगावी आपल्याच बगलबच्चना बळ दिले.

प्रचंड दडपशाही निर्माण केली. सामान्य नागरिकाच्या मनात बदल आहे. लोक बाहेर यायला घाबरत आहे परंतु मतदान हे महाविकास आघाडीलाच करणार आहे. राहता तालुक्यामध्ये सुप्त लाट निर्माण झाली असून यामधून परिवर्तन घडणार आहे.
तमाम महिला भगिनी, दलित, आदिवासी, गोरगरीब, नागरिक, शेतकरी, युवक, व्यापारी आणि बहुजन समाजातील सर्व घटक आपल्या पाठीशी असून नेतृत्वाने टाकलेला विश्वास आणि जनतेचे प्रेम यामुळे शिर्डी मतदारसंघात यावेळेस बदल नक्की होणार असून या बदलाचे शिल्पकार सामान्य जनतेसह माता भगिनी असणार आहे.
सत्ताधाऱ्यांची मोठी शक्ती अशी सर्वत्र गर्जना आहे. मात्र गणेश कारखाना आणि दक्षिण नगर मध्ये जनतेने मोठी शक्ती असल्याचे दाखवून दिले आहे. धनशक्ती विरुद्धच्या या लढाईत आपल्या पाठीशी जनशक्ती उभी राहिली आहे. मतदारांनी घाबरू नये 20 तारखेनंतर राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असून शिर्डी मतदार संघात सुद्धा आपलाच मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे.


यावेळी पाटपाणी कृती समितीचे उत्तमराव घोरपडे म्हणाले की, राज्याचे लक्ष शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. परिवर्तन अटळ आहे. लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले. ज्यांनी या कामाला विरोध केला ते आता श्रेय घेत आहे. परंतु जनतेला खरे माहिती आहे. जनता आता सौ प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी एकवटली आहे. या तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी सौ घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले.
यावेळी गावांमधून सौ.प्रभावती घोगरे यांच्या संवाद यात्रेला मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला.