राधाकृष्ण विखे हेच आमचा नेता, त्यांच्या विजयात भागीदार होण्याचा मतदारसंघातील जनतेचा शब्द

डॉ.सुजय विखे पाटील यांनी लोणी खुर्द, मापारवाडी व परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला. घराघरात भेट देत त्यांनी मतदारांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी पक्षाच्या योजना, विकास धोरणे व पुढील संकल्पना उलगडून सांगतानाच कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


महायुतीच्‍या प्रचाराला मतदारांचा उत्‍कृष्‍ठ प्रतिसाद मिळत असून, महायुती सरकारच्‍या योजनांमुळे लाभार्थीही आता महायुतीला मतदान करणार असा विश्‍वास व्‍यक्‍त करताना दिसत आहेत. मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मिळालेला लाभ याचा उत्‍साहही महिला मतदारांमध्‍ये ठळकपणे दिसून येतो. त्‍यामुळे महिलांची सक्रीयता प्रचारात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.
लोणी खुर्द गावातील दौऱ्यात डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासोबत स्थानिक नेते, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांचे उपस्थित होते. मतदारांना पक्षाच्या भूमिका, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुभव संपन्न नेतृत्वाखालील विकास कामांची हमी आणि भविष्‍यातील विकास कामांच्‍या प्रक्रीयेची माहीती त्‍यांनी संवादातून मतदारांना दिली. विविध गावांमध्ये ग्रामस्थांनी डॉ. विखे पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले व पक्षाला संपूर्ण पाठिंबा देत आश्‍वासित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *