ज्यांनी चाळीस वर्ष या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले त्यांना आणि त्यांच्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांना निळवंडे पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही अशी टीका शिवसेनेचे संगमनेर तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे यांनी केली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राहणे यांनी म्हटले आहे की ज्यांनी गेली 40 वर्ष या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले निळवंडेवर अनेक निवडणुका जिंकल्या त्यांना या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने घरी बसवले, एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली हे त्यांना सहन होत नाही म्हणून या तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींनी व त्यांचे चुलत बंधू तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आता राजकारण करण्यासाठी कुठलेच मुद्दे शिल्लक राहिले नाही म्हणून त्यांनी निळवंडे पाण्याचे राजकारण करण्याची स्टंटबाजी सुरू केली आहे. त्यांच्या या राजकीय स्टंटबाजीला या तालुक्यातील जनतेने बळी पडू नये टेल पासून हेड पर्यंत दोन्ही कालव्यावरील गावातील ओढे नाले बंधारे पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर आहे .ते तुम्हाला अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असा विश्वास राहणे यांनी व्यक्त केला.