महिला सुरक्षितता व गुन्हेगारी विरोधात घेणार ठोस भूमिका – डॉ. सुजय विखे पाटील ; कोल्हार भगवतीपुर च्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांना दिला आधार

दादागिरी व गुंडगिरीबाबत कोल्हार भगवतीपुरने सहनशीलतेची सीमा ओलांडली आहे. गावाचे गावपण संपविण्यात गावकरी जबाबदार आहेत. गावकऱ्यांनो वेळ द्या थोडा त्यागही सहन करा .गावाचे चित्र बदलून दाखवतो. अशा शब्दांत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना आधार दिला. मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मोठी ऐतिहासिक ग्रामसभा पाहत आहे.जर गावाने जर आदर्श पाळला असता, तर ही वेळ आलीच नसती असे त्यांनी स्पष्ट केले कोल्हार व भगवतीपूर येथे महिला सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, तसेच वाढते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे प्रकार लक्षात घेता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. होते. या ग्रामसभेला प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे, कोल्हारचे माजी सरपंच ॲड.सुरेंद्र खर्डे , कोल्हारच्या सरपंच निवेदिता बोरुडे , भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रेय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, डीवायएसपी शिरीष वमने, विविध पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेला मार्गदर्शन करताना डॉ. विखे म्हणाले, “ गावातील प्लॉटिंग व जमीन व्यवहारात अंधाधुंदीवर दिसते.न कोण विकतो, कोण विकत घेतो याचा तपास न करता फक्त पैशासाठी व्यवहार केले जात असल्याची गंभीर बाब आहे.
गावातील अवैध धंद्यांविरोधात ठाम भूमिका घेऊन ते म्हणाले की. “गावात जे अवैध धंदे चालू आहेत ते सांगा, तिथे जेसीबी फिरवला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. महिला सुरक्षिततेवर त्यांनी सांगितले की, “जर पोलिसांकडून न्याय मिळाला नाही, तर कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल.” गावातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत त्यांनी पुढील दोन महिन्यांत पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले असून, अशा व्यक्तींना गावात व व्यापारात सहभागी होऊ देणार नाही, असे सांगितले. कोल्हार भगवतीपुरचे गावपण गावकऱ्यांनीच नष्ट केले असल्याचे सांगतानाच डॉ. विखे यांनी गावकऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची घोषणा त्यांनी केली व प्रत्येक गावकऱ्याने यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. डॉ.खर्डे  म्हणाले, की या गावाची ओळख यापूर्वी संवेदनशील गाव होती. पूर्वीचे हिंदू मुस्लिमांचे वाद आता राहिलेले नाहीत. मात्र आता दादागिरी व गुंडगिरी वाढत चालली आहे. थोरामोठ्यांची मानमर्यादा ठेवली जात नाही. विद्यार्थिनींना टारगेट पोरं त्रास देतात. व्यापाऱ्यांना अरेरावी करतात. गावातील भांडणे नामदार साहेब व सुजय दादांकडे गेल्यावर त्याठिकाणी तात्पुरते नमती घेतात परंतु गावात आल्यावर पुन्हा त्यांची दादागिरी सुरू होते. आम्ही राजकीय गट विसरून गावकऱ्यांबरोबर राहू असे आश्वासन डॉ.यांनी दिले. सुरेंद्र खर्डे म्हणाले, की भगवती देवीच्या पावन भूमीवर अशी सभा घ्यावी लागते हे दुर्दैव आहे सुजय दादांनी सांगितले होते, की सभेला मी स्वतः हजर राहील. गुंडगिरीपायी वस्त्यांवरील शेतकऱ्यांपुढे गावात येण्याची भीती असते. दोन-तीन वर्षापासून गावातून मुली पळून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. ग्रामसुरक्षा दल स्थापन करू सुजयदादा व पोलीस अधिकारी आपल्याबरोबर आहेत. याप्रसंगी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. स्थानिक पातळीवर अनेक ठराव याप्रसंगी संमत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *