संगमनेर येथील नावाजलेले डॉ. भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील फेबु/मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या बारावी बोर्डाच्या परिक्षेचा निकाल १०० टक्के असा घवघवीत लागला असून महाविद्यालयात पहिल्या पाच क्रमांक मिळविणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
1) कु. शेख तेहरिम सादिक ८० टक्के,
2) कु. नागरे सृष्टी विनायक ७४.७६ टक्के,
3) कु. रेवगडे वैष्णवी विठ्ठल ७१.६७ टक्के,
4) कु. उनवणे मिताली मंगेश
5) कु. भास्कर स्वामिनी विजय ६६ टक्के.
तसेच ७० टक्के पुढील १५ विद्यार्थी, ६० टक्के पुढील १८ विद्यार्थी, ५० टक्के पुढील १५ विद्यार्थी, ४० टक्के पुढील १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्वच्या सर्व ६० विद्यार्थी इयत्ता १२वीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकालाची परंपरा अखंडीत राहिली आहे. संगम सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. श्रीराज भानुदास डेरे पाटील यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, यंदाही आमच्या डॉ. बी. जी. डेरे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी च्या बोर्ड परीक्षेत १००% निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे, याचा आम्हाला मनस्वी अभिमान आहे.

हे यश केवळ टक्केवारीपुरते मर्यादित नसून, आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले विशेष गुण आणि सर्वांगीण गुणवत्ता हेच आमच्या शैक्षणिक कार्याची खरी ओळख आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचा प्रामाणिक परिश्रम आणि पालकांचे वेळोवेळी मिळालेले सहकार्य यांचे अमूल्य योगदान आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, चिकाटी आणि अभ्यासातील गांभीर्य ही खर्या अर्थाने प्रेरणादायक आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांचे योग्य मार्गदर्शन, वेळेवर मार्गक्रमण आणि मानसिक बळ देण्याचे जे कार्य केले, त्याचे मी मनःपूर्वक कौतुक करतो. एकत्रित प्रयत्नांमुळेच आज आपण हे यश साजरे करत आहोत. मी संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व संपूर्ण शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. भविष्यातही आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा हा यशाचा आलेख असाच उंचावत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विद्यार्थ्याच्या या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास जी. डेरे पाटील, उपाध्यक्ष ॲड. श्रीराज भानुदास डेरे पाटील, सौ अंकिता श्रीराज डेरे पाटील, सी.ई.ओ. सौ. अशालता प्रशांत शेट्टी मॅडम, प्राचार्या सौ. रेखा दौलत पवार मॅडम, प्राथमिक विभाग उपप्राचार्या सौ. स्मिता राजेश गुंजाळ मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.