पुन्हा कत्तलखान्यावर छापा, 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करत एकावर गुन्हा दाखल

संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे संगमनेर शहर पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या भागात आरोपी अल्ताफ रजाक् कुरेशी हा जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील कर्मचारी आणि संगमनेर शहर पोलिसांना समजली ,पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून गोमांस घेऊन जाणारी रिक्षा पकडली. त्याचबरोबर घटनास्थळी सहा जिवंत जनावर देखील मिळून आले आहेत, या जनावरांना पोलिसांनी जीवदान देत ही जिवंत जनावरे जीवदया पांजरपोळ संस्थेत दाखल केली आहेत.

पोलिसांनी या भागात छापा मारला असता घटनास्थळावरून आरोपी फरार झाला आहे .याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अल्ताफ कुरेशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( प्रतिनिधी – बाबासाहेब कडू, संगमनेर )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *