संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारातील जांभूळवाडी फाटा येथे आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अटीतटीचा झाला, अतिम सामन्यांमध्ये राहता तालुक्यातील दाढ संघ हा निफाड तालुक्यातील कसबा सुकाना या संघाचा पराभव करत आमदार चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे .

संगमनेर तालुक्यातील कासारे येथील नवनाथ कानकाटे, सचिन जोधळे, योगेश जोधळे युवा मंचच्या माध्यमातून तळेगाव परिसरात सातत्याने विविध समाजिक उपक्रम घेतले जातात. प्रथमच या वर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली .या क्रिकेट स्पर्धेतमध्ये राज्यातील नामांकित संघ सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक पटकविलेल्या दाढच्या संघाला सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांच्या कडून ७१ हजार, द्वितीय क्रमांक निफाड तालुक्यातील कसबे सुकानेच्या क्रिकेट संघाला उदयोजक नवनाथ कानकाटे यांच्याकडून ५१ हजार आणि रेंजर सायकल तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सरपंच महेश बो-हाडे यांच्यावतीने ३१ हजार रुपये जुन्नर तालुक्यातील शिवनेर या संघाला दिले गेले आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस हंगेवाडी येथील संघाला उदयोजक अमित सुपेकर यांच्यावतीने २१ हजार असे रोख स्वरूपात दिले गेले. हे बक्षीस आणि सन्मानचिन्ह वितरण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. राज्यस्तरीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उदयोजक नवनाथ कानकाटे, सचिन जोधळे, योगेश जोधळ सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे,महेश बो-हाडे, अमित सुपेकर, नंदू वराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रथमच नवनाथ कानकाटे, अमोल जोंधळे, योगेश जोंधळे या तिघांनी आमदार चषक भरवून ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि मी आपल्या सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहील तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन दिले जाईल अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिली.