२१ दिवस उलटूनही आरोपींना पोलिसांकडून अटक नाही, पोलिसांकडून आरोपींना अभय ?

दि १९ ऑक्टोबर २०२४ रोजी चंद्रकांत निवृत्ती शिंदे वय ५९ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिंदे हे त्यांची पत्नी मंदा व दोन मुले सतीष व अमोल,सुन अंजली व नांतु शिवांश यांच्यासमवेत एकत्र रहीमपुर, तालुका संगमनेर येथे राहत असुन उदरनिर्वाहासाठी शेती करतात. त्यांचा मुलगा सतीष हा भोळपट असुन त्यांचे लग्न जमत नव्हते त्यामुळे घरचे नेहमीत चितींत असायचे, वाढत्या वयामुळे लग्न होण्यासाठी अडचण येत होती, त्यामुळे त्याचा बोयोडाटा माझे चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे रा. अंजनापुर, तालुका कोपरगांव यांना दिला. त्यांच्या ओळखीची नासिक येथील एका मुलीचे स्थळ त्यांनी दाखविले आणि मुलगी बघण्याचे सर्व सोपस्कार सुरू झाले.


चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे याच्या सोबत दिनांक ९ जुन २०२४ रोजी नाशिक येथील मध्यस्थी संगिता वाघ (पुर्ण नाव माहीत नाही) रा. गणेश मंदीराजवळ, हिरावाडी, पंचवटी, नाशिक हे त्यांच्या राहात्या घरी सोनल विजय पाटील रा. गणेश मंदीराजवळ, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे त्या दोघी होत्या, त्यांच्याशी माझे चुतल सासरे यांनी ओळख करून दिली. त्यावेळी मुलगा सतिष सोबत होता, बघण्याच्या कार्यक्रमामध्ये ही माझी मावस बहिण आहे असे तेथे असलेली सोनल विजय पाटील हीने परीचय करून दिला. त्याठिकाणी मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी प्रियंका विजय पाटील ही मुलगा सतिष व सर्वांना पसंत पडली व लग्नाच्या बोलीचाली झाल्या तेव्हा संगिता वाघ व सोनल विजय पाटील या म्हणाल्या की, जर तुम्हाला प्रियंका ही सुन म्हणुन पसंत असेल व लग्न करायचे असेल तर आंम्हाला ५ लाय रूपये द्यावे लागतील., तसेच लग्न ही तुम्हांलाच करून घ्यावे लागेल. तसेच तेथे उपस्थित असलेले माझे चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे हे देखील म्हणाले की, पैसे द्यावे लागेल आणि वाटाघाटी करून ४ लाख रूपये देण्याचे ठरले. तसेच लग्न हे दि १२ जुन २०२४ रोजी रहीमपुर तालुका संगमनेर येथे राहत्या घरी पार पडले आणि पैसे ही त्याच दिवशी दिले.
दिनांक १२ जुन २०२४ रोजी दुपारी १ वाजता मुलगा सतिष चंद्रभान शिंदे व मुलगी प्रियंका विजय दिवे हीच्याशी मोजके नातेवाईक व सोनल विजय पाटील,संगिता वाघ,पर्वत शंकर गव्हाणे यांच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न लावुन लग्नात आर्धा तोळे दागिने मुलीचे अंगावर घातले व लग्नाचा खर्च १ लाख २० हजार रूपये खर्च आला. ठरल्याप्रमाणे ४ लाख रूपये रोख स्वरूपात चुलत सासरे पर्वत शंकर गव्हाणे यांच्या हस्ते संगिता वाघ व सोनल विजय पाटील यांना देण्यासाठी दिले त्यावेळी माझे नात्याने मेव्हणे असलेले प्रकाश विश्राम गव्हाणे रा.अंजनापुर, तालुका कोपरगांव हे देखील उपस्थित होते.लग्न झाल्यावर ठरल्या प्रमाणे पैसे ते घेऊन घेले. त्यांनतर सुन प्रियंका आमच्या घरी चांगली नांदली.


त्यानंतर दिनांक १० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास सोनल विजय पाटील ही आमच्या घऱी राहणार रहीमपुर तालुका संगमनेर येथे आल्या बहिण प्रियंका हिस चार पाच दिवस पहिल्या मुळासाठी घेऊन जाण्यासाठी आली आहे. पहिले मुळ असल्यामुळे आम्ही ही सुन प्रियांका हिस पहिल्या मुळासाठी पाठवले. चार पाच दिवसानंतर मी प्रियंका हिला फोन केला असता तो बंद लागला मग बहिण सोनल हिच्याशी संपर्क करून विचरणा केली असता प्रियंका आजारी आहे, तिला १५-२० दिवसांनी आणुन घालते असे सांगतले. वारंवार फोन करून विचारले असता केवळ टाळाटाळ केली.


सदर घटनेला २० ते २१ दिवस होत आले आसुन आद्याप ही आरोपीला अटक झाली नाही. तर संबधित लोकांची चौकशी सुध्दा करण्यात आली नसल्याची माहीती मिळत आहे.आरोपीला कुठलीही नोटीस दिली नाही, फिर्यादीचे साक्षीदारांचे जबाब घेतले असे पुरावे घेतले आहे. पोलीस प्रशासन आरोपीला मदत करत असल्याचा आरोप फिर्यादीकडून केला जातोय. तसेच मुलाशी लग्न करून पैसे कमवणारी ही टोळी असल्याचेही फिर्यादी सांगत असुन यामुळे भविष्यात पुन्हा आमच्या सारखी फसवणूक कोणाची होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासाने या घटनेचा तपास हा सक्षम अधिकाऱ्याकडे देणे गरजेचे आहे.

प्रतिनिधी – वैभव ताजणे, आश्वी (ता. संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *