पेमगिरीत महावटवृक्ष परिसरात महिलांसाठी मंगळवारी वटपौर्णिमा उत्सव साजरा होणार !

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील स्वराज्य संकल्प भूमी मोरदरा येथील महाकाय वटवृक्षाच्या परिसरात जाकमत बाबा आणि महायुती संगमनेर तालुका महिला आघाडीच्यावतीने खास महिलांसाठी “उत्सव माझ्या कुंकवाचा.. वटसावित्री पौर्णिमेचा” या कार्यक्रमाचे मंगळवार दि १० जून २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.


संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील मोरदरा परिसरात इतिहासकालीन महाकाय वटवृक्ष आहे. महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात महिलांचा वटसावित्री पौर्णिमा उत्सव साजरा व्हावा यासाठी जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्यावतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, धनश्रीताई सुजय विखे पाटील आणि नीलमताई अमोल खताळ पाटील या महिला मान्यवर उपस्थित राहुन सर्व महिलांना मार्गदर्शन करणार आहे. तरी महिलांनी महिलांसाठी ठेवलेल्या या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *