संगमनेर विधानसभेची निवडणूक ही धन शक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आहे ही निवडणूक आता सर्व सामान्य जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे त्यांच्या पाया खालची वाळू सरकू लागली आहे ते आप ल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील तसेच तुमच्या गावांत येऊन तुमच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करतील परंतु मतदान होईपर्यंत संयम बाळगावा असा सल्ला शिवसेना महायुतीउमेदवार अमोल खताळ यांनी आपल्याकार्यकर्त्यांना दिला.


संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महा युतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारार्थ तळेगाव गटातील वडगाव पान कोकणगाव कोंची-मांची लोहारे कसारे मेंढवन कोठे कमलेश्वर वडझरी तळेगाव ती गाव करुले निळवंडे या गावातील मत दारांच्या भेटी घेतल्या त्यावेळी आयोजित कॉर्नर सभेत खताळ बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात भाजप उपाध्यक्ष हिरामण वायकर निळवंडेचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर मेंढवनचे उपसरपंच डॉ सोमनाथ बढे माधव थोरात विनायक थोरात बाबा आहेर मिनानाथ जोंधळे लोहरेचे सुदर्शन पोकळे कसारचे सरपंच नवनाथकानकाटे कौठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
खताळ म्हणाले की, संगमनेर विधान सभे तील महायुतीची मतदारसंघातील लाडक्या बहिणीने तरुणांनी जेष्ठ नागरि कांनी सर्वांनी या तालु क्यात परिवर्तन करण्याचे ठरविले आहे त्यामुळे या परि वर्तनाच्या लढाईत आपण सर्वजण सह भागी होऊन खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलून सर्व मतदारांच्या घरी जाऊन महायुतीला मतदान करण्याचेकामआपण सर्वांनी करावे आपण ही निवडणूक जिंकल्यात जमा झाली आहे गुलालही आपलाच होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असे खताळ यांनी सांगितले.


पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपल्या भाच्यासाठी यंत्रणा पाठवून दिली लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणेत दादागिरी दहशत करणारा आणि सोयीनुसार आपली भूमिका बदल णाऱ्य निलेश निलेश लंकेच्यासाठी यंत्रणा लावली ही यांची टोळी आहे या टोळीचा मोरक्या संगमनेरचा लोकप्रति निधी आहे हे निलेश लंके शिरूर सुपा एमआयडीसी हप्ते घेऊन इकडे येऊन भाषण करतात त्यांनी आम्हाला शिकवू नये सर्वसामान्य जनतेवर दादागिरी आणि दहशत करून अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी खबऱ्याचे कामकरणार आहे तुमच्यासारखे आम्ही महिलांना गाडीतून बाहेर काढून मारहाण करत तर नाही ना अशा शब्दात समाचार घेतला.
जर तुम्ही म्हणत असाल संगमनेरतालुका आमचा परिवार आणि कुटुंब आहे असे ते म्हणत आहे तर मंग निंबाळे येथे झालेल्या घटने मधील मुलगी तुमच्या कुटुंबातील नव्हती का तुम्ही साधा निषेध सुद्धा करू शकले नाही ज्यांनी मारहाण केली ते तुमचे कोण होते असा परखड सवालही महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळा साहेब थोरात यांचे नाव न घेता उपस्थित केला