महाविकास आघाडी सरकार महिलांना 3000 रु. महिना आणि सुरक्षितता देणार – डॉ. जयश्रीताई थोरात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान झाला आहे. मात्र मागील अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित असून महायुती सरकार फक्त निवडणुकीसाठी खोटे बोलत आहेत. या उलट महाविकास आघाडी सरकार महिलांना 3 हजार रुपये महिन्यासह सुरक्षितता देणार असल्याने सर्व महिलांनी महाविकास आघाडीच्याच पाठीशी उभे राहावे असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले असून ग्रामीण भागातून काढलेल्या पदयात्रांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ डॉ जयश्रीताई थोरात यांनी संगमनेर खुर्द, चंदनापुरी, झोळे,खांडगाव, हिवरगाव पावसा या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.याप्रसंगी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात हे आपल्या तालुक्याचे कुटुंबप्रमुख आहेत. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचा विकास व्हावा यासाठी अविश्रांत काम त्यांनी केले आहे. एकही दिवस कधी सुट्टी घेतली नाही. संगमनेर तालुका हाच परिवार मानला.आज चांगले वातावरण आणि सर्व क्षेत्रातील विकास यामुळे संगमनेर तालुक्याचे नाव राज्यात घेतले जात आहे. सुसंस्कृत राजकारणाची आपली परंपरा आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे.महाराष्ट्राने कायम महिलांचा सन्मान केला आहे. मात्र मागील अडीच वर्षांमध्ये महिला सुरक्षित नाहीत. निवडणुकीसाठी जमले बाजी करणारे भाजप सरकार आहे. खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची पद्धत असून पंधरा लाख रुपये देणारे सरकार पंधराशे रुपये वर आले. पण त्यावर भरोसा नाही.आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीने कायम विश्वासाने काम केले असून दोन लाखाची विनाआट कर्जमाफी केली होती. आता नव्याने महिलांसाठी महालक्ष्मी योजनेतून दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली असून महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे.

याचबरोबर वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.महाविकास आघाडी म्हणजे विश्वासाची माणस आहेत. आमदार बाळासाहेब थोरात या मध्ये प्रमुख नेते आहेत. आपण सर्वांशी त्यांच्या पाठीशी उभे राहून राज्यातील महायुती सरकार उखडून टाकण्याबरोबरच सर्वाधिक मतांनी आमदार थोरात त्यांना विजय करण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.तर अर्चना बालोडे म्हणाल्या की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या सरकारला आपण त्यांची जागा दाखवणार असून आपल्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासाठी पुढील आठ दिवस महिला भगिनींनी घरोघर जाऊन प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.गावोगावात मतदारांशी संवाद साधताना डॉ. जयश्रीताई थोरात व कार्यकर्त्यांचे नागरिक व महिलांनी मोठे उत्स्फूर्त स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *