संगमनेर हे शांत व सर्वधर्मसमभावाचे शहर आहे. हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत असताना काही लोक फक्त राजकारणासाठी विनाकारण वाद पेटवत आहेत. आज मारहाण झालेले साधू हे हिंदू आहेत आणि मारहाण करणारे सुद्धा हिंदू आहेत. त्यामुळे बुद्धिभेद करून तेढ निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी हिंदू साधूंना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले आहे.

अमर कतारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे की, सध्या राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. संगमनेर शहर हे शांतता प्रिय आहे. परंतु काही शक्ती संगमनेर शहरात तणाव निर्माण करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ही अदृश्य शक्ती काम करत आहे. आज हिंदू साधूंना झालेली मारहाण ही दुर्दैवी असून मारणारे सुद्धा हिंदूच आहेत. या गोष्टीचे राजकारण कोणी करू नका. शेवटी मानवता हा धर्म आहे. आणि हिंदू धर्माने नेहमी मानवतेची शिकवण दिली आहे.

काही जातीयवादी शक्ती आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हे उद्योग करत आहेत. आणि हे सुजाण संगमनेरकरांना मान्य नाही. त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता सत्यता तपासावी संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करू पाहणाऱ्यांना वेळीच रोकावे. जातीय तेढ निर्माण करणे आणि राजकारण करणे ही भाजप प्रणित पक्षांची कूटनीती असून कोणीही भूलथापांना बळी पडू नका व ज्यांनी हिंदू साधूंना मारहाण केली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.