जेव्हा समुद्रात वादळ तयार होते आणि जहाज भरकटायला लागते तेव्हा समोर असलेल्या दीपस्तंभ मार्गदर्शन करत असतो . याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात मोजकेच व्यक्तिमत्व असून आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याच्या राजकारणातील दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन शिरूरचे खासदार संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित युवा निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, मा. मंत्री आमदार अमित देशमुख खासदार निलेश लंके ,खासदार भाऊसाहेब वाकचौरे ,मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात ॲड. माधवराव कानवडे , सौ दुर्गाताई तांबे ,रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे ,अजय फटांगरे, रामहरी कातोरे, अमर कतारी, अशोक सातपुते, संजय फड, यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यामध्ये आमदार आणि मंत्री सुद्धा आता विकत घेता येत आहेत. ती वाईट प्रथा निर्माण झाली आहे. महायुतीला लोकसभेमध्ये मतांची कडकी पडली म्हणून आठवली बहीण लाडकी. महायुती हे फोडाफोडी आणि पक्ष व चिन्ह चोरून आलेले सरकार आहे. ते उजळ माथ्याने महाराष्ट्रात फिरू शकत नाही. आणि त्यांना तो अधिकार नाही.पंधरा लाख रुपये देण्याचा आश्वासन देणारे पंधराशे रुपये देत आहेत. हा सुद्धा त्यांचा चुनामी जुमला आहे. मव्या सरकार सत्तेवर आल्यास महालक्ष्मी योजनेतून शाश्वत 3000 रुपये महिना 6 गॅस सिलेंडर मोफत व तीन लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार असून सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या स्वच्छ व कर्तबगार नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहत संगमनेर तालुक्यातून मतांचा विक्रम करा असे सांगताना तू किती बी ताण ,येणार नाही बाण असा सूचक इशारा महायुतीला दिला. तर खासदार लंके म्हणाले की, पूर्वेकडचे काही लोक संगमनेर मध्ये खेटण्यासाठी आले. इथे खरा वाघ आहे. वाघाच्या भीतीने हे घाबरून पळाले. आता त्यांना मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा येता येत नाही. अहमदनगर दक्षिण मध्ये त्यांना झटका मिळाला आहे आता राहत्या मध्ये त्यांना झटका मिळणार आहे. बहिर्जी नाईक हे निष्ठावंत होते त्यांनी कधी निष्ठा बदलली नाही मात्र संगमनेर मधील तोतया खबरीलाल याचा जनतेने कडेलोट करावा असे आवाहन केले.


तर आमदार अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वच्छ नेतृत्व असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वकर्तृत्वातून राज्यात आपली व तालुक्याची ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार असून यावेळी संगमनेरकरांना मोठी संधी आहे असे ते म्हणाले. तर आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास याचबरोबर सतत केलेले काम हे जनतेपर्यंत घेऊन जाताना 20 तारखेपर्यंत सर्वांनी चांगले नियोजन करा संगमनेर तालुक्याबरोबरच राहता तालुक्यामध्येही आपल्याला दुरुस्ती करायची असल्याचे ते म्हणाले, यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आमदार डॉ सुधीर तांबे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक नेत्या डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केले यावेळी ओंकार बिडवे, सचिन दिघे ,सुभाष सांगळे, महेंद्र गोडगे,रमेश ने, प्रदीप हासे, वैष्णव मुर्तडक, अशोक सातपुते, बाबासाहेब कांदळकर विविध तरुणांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी तालुक्यातील युवक नागरिक महिला व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते