आमदार बाळासाहेब थोरातांना आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. त्यांच्या हातात राज्य दिले तर शेतीपासून अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील सभेत केले.

राहता येथे सौ. प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात ,खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ ,राजेंद्र फाळके, ॲड नारायणराव कारले, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होतेयावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावरून बरीच चर्चा झाली. तरुणांच्या रोजगाराची मोठी समस्या आहे. शेतीत अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवायचे असतील तर बाळासाहेब थोरातांना तुम्ही आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तेथे आहेत. राज्याचा कृषिमंत्री म्हणून देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी सर्वोत्तम काम केले, हे आपण पाहिले. त्यांना सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव आहे.देशात सरकार चालवण्यासाठी 272 खासदार आवश्यक असतात मात्र 400 पार्क नारा देऊन या लोकांच्या मनामध्ये राज्यघटना बदलाविषयी काही सुरू आहे .अशी शंका सर्वांच्या मनात निर्माण झाली. आणि त्यातून महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला मोठ्या कौल दिला. त्यानंतर या सरकारला लाडकी बहीण आठवली .खरे तर महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे .परंतु सध्या महाराष्ट्रात मागील सहा महिन्यात 866 मुलींची अपहरण झाले आहे . ही मोठी शोकांतिका आहे.राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला आवडलेले नाही आणि ही महाराष्ट्राची परंपरा नाही असे सांगताना सौ प्रभावती घोगरे सह सर्वांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.