निळवंडे धरण व कालवे आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले आहे. कालव्यांद्वारे शेतामध्ये पाणी आले आहे. भोजापूर चारीसह निळवंडे कालव्यातून वंचित राहिलेल्या सर्वांना पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांचे काम सुरू असून या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन युवक नेत्या डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.
तळेगाव भागातील काकडवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, सोनोशी, सुकेवाडी ,समनापुर, येथील नागरिक व महिलांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या यावेळी समवेत बी आर चकोर सौ.पद्माताई थोरात, जनार्दन कासार, सखाराम शरमाले, सचिन गायकवाड सुनील कासार, अलका गिरी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.



यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असूनही आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. संगमनेर तालुका त्यांनी परिवार मानला आहे .आणि तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या विकासासाठी त्यांनी काम केले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असून ही निवडणूक तालुक्यातील नागरिक व महिलांनी हाती घेतली आहे.
निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले. त्यांच्या प्रयत्नातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले जो भाग वंचित आहे. त्याला पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केले आहे. उपसा जलसिंचन योजना मंजूर करून ठेवल्या होत्या. विद्यमान पालकमंत्री यांनी त्या रद्द केले आहेत परंतु वीस तारखे नंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार असून निळवंडे कालवे व भोजापूरच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी नियोजन केले असून त्यासाठी काम होणार असल्याचे डॉ.जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.



तर बि आर चकोर म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांनी भोजापुर चारीतून अनेक गावांना पाणी दिले आहे. जे उर्वरित गाव आहेत त्यांना पाणी देण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी मोठा प्रयत्न होतो. परंतु यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उपसा जलसिंचन योजना या अत्यंत प्रभावी आहे .आमदार थोरात यांनी ती मंजूर करून ठेवली .मात्र विखे यांनी ती रद्द केली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार सत्तेपर्यंत आल्यावर ही उपसा जलसिंचन योजना मंजूर करून याद्वारे सर्व भागाला पाणी मिळणार आहे. भूलथापा देणारे आता निवडणुकीसाठी येतील त्यांना आपल्या पाण्याची आणि भावनांशी घेणे देणे नाही. त्यामुळे कोणीही विरोधकांच्या खोटे आश्वासनाला बळी न पडता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.
यावेळी विविध गावांमधून निघालेल्या संवाद यात्रांना नागरिक महिला व युवकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.