२२२ शेवगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत त्रेपन्न हजार मतांनी विजयी झाल्यावर आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदारसंघात विकास कामाचा सुरू केलेला धडाका गेली नऊ वर्ष कायम असल्याने मतदारसंघ विकासाचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे.पती मा.आ. स्व.राजीव राजळे यांनी दुरदृष्टीने मतदारसंघाच्या विकासासाठी तयार केलेला आराखडा समोर ठेवुन त्याची अंमलबजावणी करण्याचे काम त्या करत आहेत. विधानसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातुन हजारो कोटी निधी आणुन विकास कामे केली. स्व.राजीव राजळे यांचे मतदारसंघ विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वतःला झोकुन देत पुर्ण वेळ काम सुरू केले.असे दुर्मीळ नेतृत्व मिळणे हे मतदारसंघातील जनतेचे भाग्य आहे.


सकाळी सात वाजता जेवणाचा डबा सोबत घेऊन घराबाहेर पडून त्यांचे कामकाज सुरू होते. वेळ मिळेल तेथे किंवा प्रवासात जेवण करणे मतदारसंघात दिवसभर भेटी, समस्या, भुमिपुजन, लोकार्पण असे रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असते.प्रत्येक गावात निधीतुन किमान चार पाच विकास कामे मग त्यामध्ये रस्ते, बंधारे, सभामंडप तसेच आवश्यक कामे पुर्ण करण्यात त्यांना यश आले आहे. गावागावातील नागरिक त्यांच्या कामावर प्रचंड खुश असुन जनतेनीच त्यांना कार्यसम्राट आमदार ही पदवी बहाल केली आहे. विरोधकांची टिका व आरोपांकडे दुर्लक्ष करत कामाला प्राधान्य देणे.विरोधकावर कधीही चुकीची व खालच्या पातळी वर टिका न करणे. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता काम घेऊन आला तर भेदभाव न करता योग्य न्याय, सन्मान देणे त्यामुळेविरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धात्यांच्या कामाचे कौतुक व प्रशंसा करतात.जनतेमध्ये त्यांच्या विषयी मोठा विश्वास व अपुलकीची भावना आहे.पाथर्डी तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थासह वृध्देश्वर कारखाना, बाजार समिती, खरेदी विक्री संघ अशा सहकारी संस्थावर वर्चस्व असुन सक्षमपणे चालवत आहेत. भाजपाने दिलेला प्रत्येक कार्यक्रम जिल्ह्यात सर्वात प्रथम पुर्ण क्षमतेने यशस्वीपणे राबविला जातो.त्यामुळे मतदारसंघात भाजपाची त्यांनी मजबुत बांधणी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सर्वच नेते मंडळी, पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
हॅट्रीक करून तिसऱ्यांदा आमदार होऊन मंत्रीपदाच्या त्या प्रबळ दावेदार असुन विकासनिधी खेचुन आणण्यापेक्षा राज्याला निधी देण्याचे भाग्य त्यांना मिळणार आहे. आजे सासरे स्व.दादापाटील राजळे व पती स्व.राजीव राजळे यांची जयंती व पुण्यतिथी, सासरे आप्पासाहेब राजळे यांचा वाढदिवस असे कार्यक्रम त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभतील असे दरवर्षी त्या साजरे करतात मात्र स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत फक्त साधेपणाने कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारतात.त्यामुळे मतदारसंघात विकासाची घोडदौड सुरू राहण्यासाठी अशा या कार्यसम्राट, लोकप्रिय, सुसंस्कृत, शांत, संयमी, परिपक्व व अनुभवी नेतृत्व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पाठीशी मतदारसंघातील जनता खंबीरपणे उभी राहुन नक्कीच साथ देईल याची खात्री आहे.