विरोधकांनाही भावणारा स्वभाव असलेलं साधं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार मोनिकाताई राजळे

जनसामान्यांप्रती असलेली अनुभूतीनिष्ठा व नैतिक पालकत्वाची जाण यामुळे आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या कार्याची ओळख मतदार संघच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे.राजकारणातील  आमदार मोनिकाताई राजळे यांच्या स्वभाव  विरोधकांनाही भावत आहे.प्रत्येक सामाजिक,राजकीय विकासात्मक कामासाठी त्यांच्या पायाला भिंगरी लागल्यासारखी त्यांचा संपर्क निमित्त असल्याने मतदार संघावर त्यांची घट्ट पकड झाली आहे.मोनिकाताई यांचे माहेर व सासर हे दोन्हीही कुटुंब राजकारण व समाजकारणाशी निगडित आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांनी लहान असताना त्यांचे वडील अशोक पाटील डोणगावकर यांच्याकडे विविध गावचे नागरिक आपल्या अडचणी घेऊन यायचे व त्या अडचणी  कसे सोडायचे हे मोनिकाताई यांनी लहानपणा पासून पाहत आल्या आहेत.वडिलांच्या आमदारकीच्या तसेच मंत्रिपदाच्या कालखंडात मोनिकाताई यांनी जवळून पाहायला व अनुभवायला मिळाल्याने  हे बाळकडू मोनिकाताई यांना लहानपणीच मिळाल्याने त्यांना  लोकप्रश्नांची व विविध विकास कामांच्या निकडीची जाण होती तर त्या नंतर सासरी राजळे कुटुंबाची सून म्हणून आल्या नंतर मोनिकाताईचे सासरे माजी आमदार अप्पासाहेब राजळे व पती माजी आमदार स्व. राजीव राजळे हे सुद्धा लोकांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवतात व विकास कामांचा पाठपुरावा कसा करतात हे सुद्धा आमदार मोनिकाताई ह्या पाहत होत्या.


राजकीय समीकरणे पन्नास टक्के महिला आरक्षण आणि स्व. राजीवजी राजळे यांची राजकारणातील नवी दृष्टी या सर्वांचा योग्य परिपाक म्हणजे सण २०१२ ला मोनिकाताई राजळे यांनी पाथर्डी तालुक्यातील मिरी या जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या या लढती मधून त्यांनी विजयश्री खेचून आणली. त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष झाल्या. या काळात त्यांनी संपूर्ण जिल्हा आपल्या कर्तुत्वाने आणि लोकसंपर्काच्या जोरावर एका वेगळ्याच कार्यप्रणालीचे अस्तित्व निर्माण केले.माहेर व सासर या दोन्ही कुटुंबांना राजकीय वारसा असल्याने राजकारणाची कडू – गोड प्रसंगांना तोंड देत ऊभारी घेणारे हे नेतृत्व जनसेवेत स्थीर झाले.दरम्यान स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे व वडील अशोक पा.डोणगावकर यांचा असलेला कौटुंबिक जिव्हाळा व संबंधामुळे मोनिकाताई यांनी सण २०१४ ला भाजपत प्रवेश करून विधानसभा लढवली जुन्या – नव्या कार्यकर्त्यांचा उत्तम मेळ घालत त्यांनी या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला.आज स्व. दादापाटील राजळे,आमदार आप्पासाहेब राजळे,आमदार राजीवजी राजळे या सर्वांच्या राजकीय कर्तुत्वाची धुरा आमदार मोनिकाताई राजीव राजळे समर्थपणे पेलवत पुढे घेऊन मतदार संघात नवीन  व्हिजन घेऊन पुढे जात आहे.विकास कामांची प्रक्रिया चिरकाळ चालणारी असल्याने ती चालत राहणार असून पाथर्डी तालुक्याची असलेली दुष्काळी आणि कोरडवाहू ओळख पुसून टाकण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या तत्कालीन जलसंधारण मंत्री असतांना जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबवली त्यातून तालुक्याला जल संजिवनी देण्याचे काम केले.

आजातशत्रुता,प्रचंड सहनशीलता,सकारात्मक दृष्टी,कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करणे व अहोरात्र कष्ट करण्याची तयारी या सर्व गुणांमुळे आज त्या महाराष्ट्रात एक कर्तृत्ववान व संयमी नेतृत्व म्हणून मोनिकाताई ओळखल्या जातात.नेहमीच कार्यकर्त्यांच्या गर्दीत दिसणाऱ्या आमदार मोनिकाताई जेव्हा स्व . राजीवजी राजळे यांच्या अकस्मित जाण्याने स्वतःला चार भिंतीच्या आत राहणं पसंत करतात तेव्हा , ‘ताई तुम्ही बाहेर पडा ‘ असा शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन आग्रह धरला. अशातच त्यांची बालमैत्रीण पंकजाताई मुंडे जेव्हा स्वतः सांत्वनासाठी त्यांच्या कडे येतात तेव्हा जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांचा कडा पाणवलेल्या होत्या. या जनसमुदायाच्या प्रेमापोटी आपले दुःख बाजूला सारून त्यांनी पुन्हा मतदारांचे पालकत्व  मोठ्या हिंमतीने हाती घेतले.मध्यंतरीचा काही काळ सोडल्यास देशात व राज्यात आपल्याच पक्षाची सत्ता असल्याने लोकहिताच्या कामाची साखळी त्यांनी मजबूत केली.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनहिताच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.जलयुक्त शिवार अभियानामधून त्यांनी कोट्यावधींचा निधी शेवगाव – पाथर्डी मतदार संघात आणला . रस्ते,वीज,पाणी,सभामंडप,महिला बचत गट,आरोग्य सुविधा अशा लोकोपयोगी कामाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा व मतदारांचा विश्वास संपादन केलेला आहे. आज मतदारसंघातील एकही गाव असे नसेल कि जेथे विकासकामे केली नाहीत. या सर्व कामाची पावती म्हणून जनतेने आमदार मोनिका ताई राजळे यांचावर विश्वास ठेऊन दुसऱ्यांदा निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची संधी दिली. मतदारसंघ हा दुष्काळी पट्टा असल्याने शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नाला किमान हंगामी पाणी तरी मिळालेच पाहिजे यासाठी मोनिकाताई यांनी  जलसंधारणेचे काम सर्व प्रथम हाती घेण्याचा निर्णय घेतला.सुदैवाने युती शासन,तत्कालीन ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे,तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गावोगावी साखळी बंधारे,पाझर तलाव,कोप बंधारे,साठवण तलाव,सीसीटी बंधारे यांची निर्मिती व दुरुस्ती ही कामे करण्यास प्राधान्य दिले त्याचे मूर्त स्वरूप आज मतदार संघात दिसत आहे, त्याच बरोबर आरोग्यासाठी जनजागृती व सर्व सामान्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सण २०१८ मध्ये भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करत एकाच दिवसात २५ हजारहून अधिक रुग्नांची तपासणी करून या शिबिरात सर्व गरजू रुग्णांना औषधोपचार व पुढील मार्गदर्शन व वैद्यकीय मदत देण्याच्या दृष्टीने काम सुरु ठेवले. या मध्ये विशेषतः महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर असलेल्या रुग्णांवर निदान व उपचार करण्यात आले त्याच बरोबर ६४ लहान मुलांच्या ह्दयाचे ऑपरेशन मोफत करण्यासाठी साहाय्य केले. या आरोग्य शिबिरासाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व मेडिकल व्यावसायिकांचे मोठे सहकार्य मिळाले. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यास आमदार मोनिकाताई यांनी  प्राधान्यमुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,पंचवीस पंधरा,जिल्हा वार्षिक योजना,नाबार्ड तसेच सीआरएफ फंड व अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करत ग्रामीण भागातील रस्ते वाडया वस्त्यांशी जोडले. त्या साठी राज्यात असलेल्या तत्कालीन भाजप च्या शासनाचा मोठा फायदा झाला, मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण मार्ग,इतर जिल्हा मार्ग,जिल्हा मार्ग व राज्यमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे वाहून त्यांची दुरावस्था झाली. हे रस्ते आता परत दुरुस्त करणे गरजेचे असून त्या साठी आमदार मोनिकाताई यांनी  लागणाऱ्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे .मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून अनेक वाड्या वस्त्या गावाशी जोडल्या आहेत.

केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेची माहिती व लाभ आपल्या मतदारसंघातील मतदारांना मिळवून देण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात . अंत्योदय योजना , प्रधानमंत्री आवास योजना , जनधन खाती , पंतप्रधान मंत्री स्वनिधी योजना , केंद्र सरकारच्या अशा अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ मतदार संघाला मिळवून दिला. मोदी @९ महाजनसंपर्क अभियान निमित्त घरोघरी संपर्क अभियान शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात उत्कृष्ट रित्या राबविण्यात आले. घरोघरी भेट देऊन मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या काळात झालेल्या विकास कामांचे पत्रकांचे वाटप करण्यात आले. मतदार संघातील सामान्य मतदारांच्या मुला-मुलींनी मिळवलेल्या यशाचे कौतुक त्या आवर्जून करतात. मतदार संघातील प्रत्येकाच्या सुख – दुःखात आगदी कौटुंबिक सदस्यांप्रमाणे आवर्जून सहभागी होतात. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले या जनआरोग्य योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व गरजूंसाठी , त्यांचा मदतीचा हात सदैव पुढे असतो . तंत्रज्ञानाच्या या  आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपल्या कामासाठी करून घेताना शासनाच्या विविध योजना व निर्णयाची माहिती त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून दिली जाते. असंघटित कामगारांच्या सुरक्षा व कल्याणकारी योजना , संजय गांधी निराधार,श्रावणबाळ लाभार्थींना झालेल्या आर्थिक वाढीचा फायदा मतदारसंघातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी काही तंत्रिक अडचणी असतील तर त्यात प्रत्यक्ष लक्ष घालून , वेळप्रसंगी अधिकारी,कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देऊन सामान्यांची कामे करण्यात त्या सतत व्यस्त असतात. प्रधानमंत्री फसल बीमा योजना,किसान क्रेडिट कार्ड,प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना,महिलांसाठी अतिशय उपयुक्त व लाभदायक अशा प्रधानमंत्री उज्वला योजना,स्वच्छ भारत मिशन,बेटी बचाओ – बेटी पढाओ,स्टँड अप इंडिया,प्रधानमंत्री मुद्रा योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,मिशन इंद्रधनुष्य अशा विविध योजना लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रम व मिळावे त्यांनी आयोजित केलेले आहेत .     शेवगाव तालुक्यातील ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा दोन चे महत्वकांक्षी काम पूर्ण करण्यासाठी त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा व सातत्याने प्रयत्न असतो.मेरा बुथ सबसे मजबूत,मन की बात यासारखे ऑनलाईन कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकत्रितपणे ऐकण्याची संधी इतरांना देऊन त्यात सक्रिय सहभागी होत असतात मोटरसायकल रॅली,योग दिन,परीक्षा पे चर्चा अशा कार्यक्रमात त्या आवर्जून सहभागी होतात.केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची अंमलबजावणीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.कोणाविषयी द्वेश भाव न ठेवता सर्वांचे म्हणणे शांतपणे व संयमाने ऐकून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याकडे आमदार मोनिकाताई यांचा कल असतो. या गुणवैशिष्ट्यांमुळे आपले व विरोधक असा भेदभाव त्यांच्याकडे दिसून येत नाही. संवेदनशीलता,आकलन शक्ती,स्मरणशक्ती,प्रतिभा शक्ती ,निर्णय शक्ती,समोरच्या व्यक्तीची योग्य पारख,विवेक अशा गुणांची आवश्यकता नेतृत्वाच्या अंगी असावी लागते , हे सर्व गुण आमदार मोनिकाताईंच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले आहेत , त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांना पाहण्याची इच्छा सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *