महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सर्व जाती धर्मांना सोबत व विश्वासात घेवून जातीय सलोखा व सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवत असतात शिर्डी मतदार संघातील सर्व धर्मीय अनेक समाज बांधवांसाठी मंत्री विखे पाटील हाच एकमेव पक्ष आहे शिर्डी मतदार संघातील सर्वच गावातील रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आंबेडकर प्रेमी समाज बांधव या निवडणुकीत प्रत्येक गावातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजय करतील व विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील अशी ग्वाही रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे व रिपाई अहिल्यानगर जिल्हा युवकचे जिल्हाध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पूभाऊ बनसोडे यांनी दिली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे कार्यकर्ते तसेच गावोगावचे आंबेडकर प्रेमी समाज बांधव महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत खडकेवाके येथे नुकतीच एक प्रचार सभा संपन्न झाली यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे म्हणाले की शिर्डी विधानसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील परिवार नेहमीच सर्व समाज बांधवांना मान सन्मान देत असतात सामाजिक स्तरावर राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक समाजासाठी संकटात मदतीसाठी धावून येतात आंबेडकर प्रेमी समाज बांधवांनी विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता मंत्री विखे पाटील यांना मतदान करून मताधिक्याने विजयी करावे कार्यक्षम नेतृत्व असणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेहमीच दीनदलित गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य यांच्या हाकेला साथ देणारे कर्तुत्वान नेते आहेत डॉ सुजयदादा विखे पाटील समाज बांधवांच्या व युवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात विविध योजनांच्या माध्यमातून गावो गावच्या दलित वस्त्यांचा चेहरा मोहरा बदलून आंबेडकर प्रेमी समाज बांधवांचे राहणीमान व जीवनमान उंचविण्यात त्यांचे योगदान आहे याची सर्वांना जाणीव आहे त्यामुळे रिपाईच कार्यकर्ते तसेच आंबेडकरी प्रेमी समाज बांधव या निवडणुकीत मतदान रूपातून सर्वाधिक ताकद दाखवून विखे पाटलांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी योगदान देणार आहेत निवडणुकी दरम्यान आंबेडकरी समाज बांधवांवर खोटं प्रेम दाखविणारे अनेक नेते पुढारी व कार्यकर्ते येतील भाषणे ठोकतील मात्र ते नेते फक्त आणि फक्त निवडणुकी पुरतेच राहतील याची जाणीव आंबेडकरी प्रेमी समाजातील अनेक बांधवांना असल्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात मंत्री विखे पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही डाळ समाज बांधव शिजू देणार नाहीत मतदानातून प्रचंड मताधिक्याने विजयी करून शिर्डी मतदार संघासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हाच सर्व धर्मीय बांधवांचा पक्ष असल्याचे आंबेडकर प्रेमी समाज इतर धर्मीय बांधव सिद्ध करतील असा विश्वास राहाता तालुका अधक्ष धनंजय निकाळे व रिपाई चे जिल्हा युवक अध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पूभाऊ बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.