महायुतीचे उमेदवार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघात शहरी व ग्रामीण भागाचा वैशिष्ट्यपूर्ण विकास साधला आहे खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला आहे वर्ग दोन च्या जमिनी एक करण्या बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे अनेक गावांना गावठाण नसल्याने गावठाणा करिता पाणी पुरवठा योजना स्मशानभूमी तसेच शासकीय कार्यालयांस शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून दिली आहे गोरगरीब कुटुंबांचे व झोपडपट्टी वासियांचे हक्काचे घराचे स्वप्नपूर्ती करिता झोपडपट्टी पुनर्वसनासाठी निधी व जागेची उपलब्धता करून दिली आहे प्रत्येक घटकाच्या विकासासाठी पुढाकार व ध्यास घेऊन सर्वांचे जीवनमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उंचावत आहे त्यामुळे शिर्डी मतदार संघाचे ते विकास पुरुष आहेत या निवडणुकीत त्यांना उच्चांकी मताधिक्याने विजयी करून या मतदार संघात विखे पाटील यांच्या समोर विरोधकांचा टिकाव लागत नसल्याचे मतदार बंधू मतदानाद्वारे सिद्ध करणार असल्याची ग्वाही निमगाव कोऱ्हाळे चे सरपंच कैलास भाऊ कातोरे यांनी दिली.

महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सरपंच कैलास भाऊ कातोरे व ग्रामस्थ गावात गृहभेटी बैठका प्रचार फेऱ्या काढत आहेत याद्वारे सरपंच कैलास भाऊ कातोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्व जातीय धर्माचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बांधवांना मंत्री विखे पाटील यांनी निमगाव कोऱ्हाळे गावचा व मतदार संघाचा साधलेला वैशिष्ट्यपूर्ण विकास व भविष्य काळातील विकासाचे प्रकल्प योजना आणि महायुती शासनाने केलेल्या लोकहिताच्या कामाची व योजनांची माहिती देत आहे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना सरपंच कातोरे म्हणाले की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी मतदारसंघात निमगाव कोऱ्हाळे गावचा वैशिष्ट्यपूर्ण विकास साधला आहे या गावचा विकासात्मक कायापालट होत आहे परिसरातील प्रचलित बाजारभावानुसार कोट्यवधी रुपये किंमत असणारी शेती महामंडळाची सुमारे 21 एकर जमीन निमगाव कोऱ्हाळे गावठाणासाठी दिली आहे.

सुशोभीकरणा करिता विकास निधी जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना झोपडपट्टी निर्मूलनासाठी व झोपडपट्टीतील कुटुंबांचे पुनर्वसना करिता शेतजमीन व निधी दिला आहे जलजीवन अंतर्गत मोठा निधी दिला असून निमगाव हद्दीत 32 एकर जागेत भव्य दिव्य महसूल भवन उभारले जात आहे त्याचबरोबर क्रीडा संकुलासाठी सोळा एकर जागा साईबाबा संस्थानचे शैक्षणिक संकुल भोजनगृह यासह इतरही प्रकल्प उभारले असल्याने निमगाव कोऱ्हाळे गावचा अभूतपूर्व विकास होत आहे.या विकासात विखे पाटील परिवाराचे सर्वाधिक मोठे योगदान आहे विकासाचे माध्यमातून येथील नागरिकांची आर्थिक उन्नती व प्रगतीलाअधिक चालना मिळणार आहे शिर्डी निमगाव कोऱ्हाळे परिसरात औद्योगिक वसाहत शासकीय कार्यालय तसेच साई संस्थांनचे प्रकल्पांसह विविध विकासकामांचे माध्यमातून या ठिकाणी विकासाची गंगा आणली आहे या परिसराची आर्थिक उन्नती व विकासात्मक प्रगती होत आहे याची जाणीव या भागातील नागरिक व मतदारांना असल्याने विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विक्रमी मतदान करून मोठ्या मताधिक्यांनी विजयी करणार असल्याचा निर्धार मतदारांनी केला आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या निवडणुकीत उच्चांकी मतदान देऊन गावोगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते ऐतिहासिक विजय प्राप्त करून देणार आहेत आहे त्याच वेळी विरोधकांचा सुपडा साफ करुन या मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील परिवार सोडून इतरांना कोणालाही मतदार थारा देत नाही यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणार असल्याचा विश्वास निमगाव कोऱ्हाळे गावचे सरपंच कैलासभाऊ कातोरे यांनी व्यक्त केला आहे.