उद्या अमोल खताळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेरमध्ये

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे व भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो तरुणांची मोटर सायकल रॅली निघणार आहे तर या निवडणूक प्रचाराची सांगता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने होणार आहे.


गेली दहा ते पंधरा दिवसापासून विधान सभा निवडणुकीचे रणधुमाळीजोरातसुरू आहे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन मतदारां च्या गाठीभेटी घेत आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले आहे तसेच संपूर्ण संगमनेर शहर आणि घुलेवाडी या भागा तून सुमारे अडीचशे ते तीनशे तरुणांच्या मोटरसायकल रॅलीने संपूर्ण भागाचे लक्ष वेधून घेतले होते तर महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा खताळ यांच्या प्रचारार्थ सावरगाव तळ पेमगिरी वडगाव लांडगा येथे जाहीर सभा घेत खताळ यांना निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे.
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचाराच्या सांगतेच्या निमित्ताने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढ ण्यात येणार आहे तर दुपारी तीन वाजता नवीन नगर रोड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने या प्रचाराची सांगता होणार आहे तरी या जाहीर सभेसाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *