राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात युवा वर्ग मोठ्या संख्येने सक्रिय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेरणास्थान मानणाऱ्या युवकांनी कर्डिले यांच्या विजयाचा निर्धार केला आहे. राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील शेकडो युवकांनी कर्डिले यांच्या प्रचारार्थ गावातून भव्य रॅली काढली.

भाजप तसेच कर्डिले यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. आताच्या घडीला देशात भारतीय जनता पक्ष सर्वात मजबूत आणि जनहितासाठी काम करणारा पक्ष आहे. राज्यातील महायुती सरकारने युवा वर्गासाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत. गतिमान विकासासाठी महायुती सरकार पुन्हा येणे आवश्यक आहे. त्यामुळेच राहुरी मतदारसंघातून कर्डिलेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय युवकांनी बोलून दाखवला.