संगमनेर तालुका हा एकनिष्ठ विचारांचा आहे. आमदार बाळासाहेब थोरात एक काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे. तर संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेर मध्ये पाऊल ठेवू शकणार नव्हते. मात्र त्यांच्या नावाखाली तालुक्यातील तरुणांना बनवाबनवी करून संगमनेरात बोलून फसवले असल्याची घाणाघाती टीका अमर कतारी यांनी केली असून मुख्यमंत्र्यांच्या सभेचा फुसका बार झाल्याचे म्हटले आहे.

कतारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याचे मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि संगमनेर मध्ये गद्दारीला माफी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथे येणार नव्हते.हे सर्वश्रूत होते. कोणताही शासकीय अधिकृत दौरा नव्हता. मात्र राष्ट्रवादी – काँग्रेस – भाजप शिंदे गट असा प्रवास करणारा येथील उमेदवार यांनी मुख्यमंत्री येणार अशी खोटी जाहिरात केली.संगमनेर तालुक्या ऐवजी बाहेरच्या तालुक्यातील तरुण बोलवले. श्रीकांत शिंदे सुद्धा येणार नव्हते.मात्र अशी ही बनवाबनवी करून तरुणांना यांनी फसवले. एक तर तुम्ही शिंदे सेनेचेही एकनिष्ठ नव्हते. तुम्ही भाजपशी एकनिष्ठ नव्हते. मूळ शिवसेना आणि भाजपवाले लांब आहेत.फक्त लोणी विखेंच्या इशारावर नाचणारी भाजप आणि शिंदे सेना शहरात असून त्यांना कोणीही थारा देत नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची मोठी पंचायत झाली असून मुख्यमंत्री आणि कोणीच पदाधिकारी संगमनेर मध्ये आले नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांनी तीव्र संताप व्यक्त केला.