राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारे नेतृत्व असलेले काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षित आणि अनाकनलीय पराभवामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संगमनेर तालुक्याचा निकाल ऐकल्यावर तालुक्यातील जनतेसह राज्यात कुणाचाही विश्वास बसत नव्हता. हा निकाल ऐकताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले तर संपूर्ण तालुक्यात एकदम भयान शांतता निर्माण झाली.

राज्यभरातून आमदार थोरात यांच्या पराभवाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा म्हणून ओळख असलेल्या आमदार थोरात यांचा झालेला पराभव हा अनेकांना सहन झाला नाही. तालुक्यातील तालुक्यातील अनेकांच्या घरात चुली पेटल्या नाही तर अनेकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले. साहित्य कला संस्कृती राजकारण आणि समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
देश व राज्य पातळीवरील माध्यमांनीही या घटनेची नोंद घेऊन हा अनाकलनीय निकाल असल्याचे नोंदवले आहे.
सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी अनेक राज्यभरातील मान्यवरांनी संगमनेर मध्ये उपस्थिती दर्शवली तर तालुक्यातील जनता ही अत्यंत मोठ्या संख्येने सुदर्शन निवासस्थानी दाखल झाली.
हा निकाल कुणालाही मान्य झाला ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ झाल्याची शंका व्यक्त होत आहे . सर्व तालुका शांत व चिंतेत आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी अशा परिस्थितीतही साकुर भागातील काही गावांना भेटी देऊन नागरिकांचे सांत्वन केले.तालुक्यातील प्रत्येकाच्या स्टेटसवर आमदार थोरात…
संघर्षात तुम्ही लढले ,आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत. सत्ता असो नसो साहेब तुम्ही साहेब आहात असे दर्शवत संगमनेर तालुक्यातील तरुणाई सह प्रत्येकाच्या स्टेटसवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या एकनिष्ठतेची छबी झळकत आहे.