संगमनेर बस स्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचे निर्देश – आमदार अमोल खताळ

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर शहरांमध्ये अद्ययावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा व कंट्रोल रूम उभारण्यात आली होती. ही सीसीटीव्ही यंत्रणा बरेच दिवस देखभाल नसल्यामुळे बंद पडून ना दुरस्त झाली आहे.याबाबत दखल घेऊन आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तसेच नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. परिवहन मंत्री सरनाईक यांनी याबाबत तत्काळ दखल घेऊन व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ यांना योग्य ते निर्देश दिल्यानंतर एम एस आर टी सी तर्फे बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.


व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरटीसी, मुंबई सेंट्रल यांनी दिलेल्या माहितीनुसार आयटी विभागातर्फे संगमनेर बस डेपोच्या ठिकाणी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे संदर्भात ई टेंडर प्रक्रिया राबविली आहे. त्याचबरोबर टीसीआयएल या सेवा पुरवठा दाराची नेमणूक झालेली आहे. तसेच ७ मार्च २०२५ रोजी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बोर्डाच्या बैठकीत मान्यता व कार्यादेश देण्यात आले आहेत.


संगमनेर हे व्यापारी व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर आहे. लाखो नागरिकांची शहरांमध्ये दररोज वर्दळ असते. महिलांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन सीसीटीव्ही यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी आमदार अमोल खताळ हे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान एमएसआरटीसी तर्फे नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणेचे हस्तांतर पोलीस प्रशासनाकडे केले जाईल. या सर्व सीसीटीव्ही यंत्रणा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सुद्धा पोलीस प्रशासनाकडेच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *