संगमनेर शहर व तालुक्यातील नामांकित शाळा, डॉ. भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडियम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील फेबु/मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या दहावी (S.S.C.) बोर्ड परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेतील पहिले चार क्रमांक मिळविणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
१) कु. आयुषी सुनीलकुमार शुक्ला 97.80%
२) कु. श्रावणी राधाकृष्ण दिघे 96.40%
३) कु. मधुरा महेंद्र फुले 95.80%
४) कु. आर्या गुलाब मंडलिक 95.00%
४) कु. आर्या किरण सातपुते 95.00% संयुक्तपणे चौथा क्रमांक
४) कु. आयेशा अनिस शेख 95.00%
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १० वीत एकूण तीन तुकड्यांमधून १२० विद्यार्थ्यांनी S.S.C. बोर्डाची परीक्षा दिली व सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणवत्तेसह उतीर्ण झाले आहेत, सलग 17 व्या बॅच चा १००% निकाल लागला आहे.
श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या:
१) ९०% पुढील एकूण विद्यार्थी – २०
२) ८०% पुढील एकूण विद्यार्थी – ३३
३) ७०% पुढील एकूण विद्यार्थी – २८
४) ६०% पुढील एकूण विद्यार्थी – १९
५) ५०% पुढील एकूण विद्यार्थी – २०

संगम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. भानुदास जी. डेरे तसेच उपाध्यक्ष ॲड. श्रीराज भानुदास डेरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यंदाही आमच्या डेरे शाळेचा इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत १००% निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली असून याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे यश केवळ टक्केवारीपुरते मर्यादित नसून, आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले विशेष कौशल्य आणि त्यातून त्यांचा झालेला सर्वांगीण विकास हिच आमच्या शैक्षणिक कार्याची खरी ओळख आहे.
या यशामध्ये विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे प्रामाणिक व अथक परिश्रम आणि पालकांचे वेळोवेळी मिळालेले सहकार्य व अमूल्य मार्गदर्शन याचाही मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य या गोष्टी खर्या अर्थाने प्रेरणादायक आहे.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे योग्य मार्गदर्शन, आणि मानसिक बळ देण्याचे जे कार्य केले, त्यासाठी त्याचे आम्ही सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक करतो. एकत्रित प्रयत्नांमुळेच आज आपण हे यश साजरे करत आहोत.
आम्ही संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व संपूर्ण शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. भविष्यातही आपल्या शाळेच्या यशाचा हा आलेख असाच उंचावत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
विद्यार्थ्यांच्या या गौरवशाली यशाबददल संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास जी. डेरे पाटील, उपाध्यक्ष ॲड. श्रीराज भानुदास डेरे पाटील, संस्थेच्या विश्वस्त सौ अंकिता श्रीराज डेरे पाटील, सी.ई.ओ. सौ. अशालता प्रशांत शेट्टी मॅडम, प्राचार्या सौ. रेखा दौलत पवार मॅडम, प्राथमिक विभाग उपप्राचार्या सौ. स्मिता राजेश गुंजाळ मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.