कळसेश्वर विद्यालय कळस बु चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा 100% निकाल लागला असून विद्यालयातून अमान इकबाल सय्यद 94.20 प्रथम, अदिती भानुदास चौधरी 92.80 द्वितीय, अदिती प्रवीण वाकचौरे 89.40 व श्रद्धा माधव कोल्हाळ 89.40 तृतीय क्रमांक तर ऋतिक सुरेश क्षीरसागर 88.20 चतुर्थ व यशश्री गणेश झोडगे 85.80 पाचवा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.\

कळसेश्वर विद्यालयातून 80 टक्क्याच्या पुढे 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विध्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापिका नंदा बिबवे, शिवाजी आवारी, मच्छिंद्र साळुंखे, गीतांजली खरबस, केशव महाले, मनीषा शिंदे, प्रशांत जाधव, प्रतीक्षा घुले, कुमार पालवे, सुरेश वाघमारे आदींचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद माजी सभापती कैलासराव वाकचौरे, संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, देवराम वाकचौरे, माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, यादव वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, संगमनेर कारखान्याचे संचालक अरुण वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, शिवसेना नेते रावसाहेब वाकचौरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, विद्यालया चे मुख्याध्यापक भाऊसाहेब घेलवडे शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
(प्रतिनिधी – नवनाथ गाडेकर)