संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून भरीव निधी आणू शकलो. या निधीतून विविध विकासकामे मार्गी लागत आहेत त्यात घुलेवाडीत सव्वा दोन कोटीची विकास कामे सुरू होत आहे. ती सर्वकामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे याची अधिकार्यांनी काळजी घ्यावी, महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदार संघातील प्रलंबित असलेली कामे मार्गी लावले जातील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत सव्वादोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे. आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, अल्पसंख्यांक सेनेचे तालुकाध्यक्ष मंजाबापू साळवे, रवींद्र गिरी, शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे, विनायक वाडेकर, भाजप उपाध्यक्ष भिकाजी राऊत, सिताराम पानसरे, विलास राऊत, रोहिदास गुंजाळ, बापूसाहेब देशमुख, भैय्या सातपुते, कैलास काशीद, स्वरूप राऊत, संजय पानसरे, रोशन कोथिंबीरे, स्वप्निल राऊत, सुनील राऊत, सुरज राऊत, प्रशांत राऊत, सुनील पानसरे, ओंकार राऊत, वैभव राऊत, रवी दिवे ,विजय घुले,ओंकार काळे, आकाश पवार, सागर पवार यांच्यासह पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता नाना अहिरे आणि घुलेवाडी ग्रामपंचायत अधिकारी रामदास दरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




घुलेवाडी ही जहागीरदारी आहे असे काही जण समजत होते. त्यांनी कधीच वंचित समाज बांधवांच्या भागाचा विकास केला नाही. निवडणुका आल्या की मगच त्यांना विकास दिसतो इतरवेळी ते या समाज बांधवांचा फक्त निवडणुकी पुरता वापर करत असतात. दादागिरीला भीक घालू नका मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय.
या तालुक्यातील दहशत व दादागिरी आपण मोडून काढत त्यांचा बंदोबस्त केला आहे. जर घुलेवाडीतील काही बगलबच्चे तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही सर्वांनी साथ दिली तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करू या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ न देता विकास कामांच्या माध्यमातून घुलेवाडी नव्हे तर संपूर्ण मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडले जातील. मात्र विकास कामे करताना ती कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, पुढील काळात ठेकेदारांनी कामाचा दर्जा चांगला ठेवला तरच तुम्ही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे करू शकाल अन्यथा तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये कामे शोधण्याची सोय करून घ्या अशी तंबीही आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना दिली.