शिंदे शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखपदी मारुती देवराम मेंगाळ

शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखपदी माजी उपसभापती मारुती देवराम मेंगाळ, तालुका प्रमुखपदी जिल्हा फेडरेशनचे संचालक सुशांत शांताराम गजे, कार्याध्यक्षपदी अमृतसागर दूध संघाचे संचालक जगन देशमुख, सचिवपदी रोहिदास किसन जाधव, सहसचिवपदी सुभाषराव सोपान येवले, उप तालुकाप्रमुखपदी हर्षल नितिन वाकचौरे यांची निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्रक आज मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे भवन येथे शिवसेना पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.

अकोले विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने ही कार्यकारणी तयार करण्यात आली असून या मधे सात जिल्हा परिषद गटांमध्ये सात उपतालुका प्रमुखांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *