ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांच्या हिरडगाव येथील गौरी शुगरने गळीत हंगाम २०२५-२६ करिता ९ लाख मे टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गौरी शुगर अॅड डिस्टलरीज ने ट्रक ट्रॅक्टर जुगाड टायरगाडी व हार्वेस्टर मशीन यांचे तोडणी आणि वाहतुकीचे करार सुरू करण्यात आले.अशी माहिती कारखान्याचे व्यवस्थापक रोहीदास यादव यांनी दिली आहे.

दोन दिवसात ४०० वाहन टोळी २५० ट्रॅक्टर जुगाड १०० टायर गाडी व दहा हार्वेस्टर मशीनचे करार झाले आहेत. मागील गळीत हंगामाप्रमाणे यावर्षी कारखाना व्यवस्थित चालून शेतकरी वाहतूकदार व कामगार यांना ऊसाच्या भावात न्याय देणार आहे. रोहीदास यादव यांनी तोडणी वाहतूकदार व कर्मचारी यांना करारासंदर्भात सूचना दिल्या व करार शुभारंभ केला सन २०२४-२५ चा गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण करून ७,१५,४१९ मेट्रिक टनाचे गाळप करण्यामध्ये श्रीगोंदा शिरूर कर्जत जामखेड दौंड आष्टी करमाळा मधील ऊस उत्पादक शेतकरी बंधू ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार अधिकारी-कामगार बंधूनी बहुमोल सहकार्य केले आहे.
यावेळी कारखान्याचे शेतकी अधिकारी व ऊसपुरवठा अधिकारी सर्व विभागाचे विभाग प्रमुख कर्मचारी तोडणी वाहतूक मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी – गणेश कविटकर)