संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण आणि अपघातप्रवण ठिकाणांच्या बाबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्या निर्देश दिले आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरीलअपूर्ण व अपघातप्रवण ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळावी, यासाठी चंदनापुरी येथील प्रमोद राहाणे रामभाऊ राहाणे व अंकुश राहाणे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे मागणी केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी लोणी येथील जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निवासस्थानी आले होते.त्यावेळीआमदार खताळ यांनी त्यांना पत्र देऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारा त्मक प्रतिसाद देत, मंत्री गडकरी यांनी संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.याबाबत मंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात पुढील कामांसाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे: या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे. महायुती च्या संघटित प्रयत्नांमुळे तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय शक्य झाले आहे त्यामुळे परिसरा तील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी ते जावळेवस्ती (CH 132/112 ते CH 134/100) या दरम्यान सर्व्हिस रोड पूर्ण करणे (LHS बाजू).चंदनापुरी घाटाजवळ नवीन व्हेईकल अंडर पास (CH 132/ 500) उभारणे.बॉक्स कल्व्हर्ट (CH 135/000) दोन्ही बाजूंनी अप्रोच रोड साठी भूसंपादन करणे.या कामांमुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढणार असून वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर आ. अमोल खताळ यांनी या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच या कामांना मंजुरी मिळाली आहे .याच निर्णयामुळे आनंदवाडी ते जावळे वस्तीदरम्यान सर्व्हिस रोडचे काम, चंदनापुरी घाटाजवळ नवीन व्हेईकल अंडर पास तसेच बॉक्स कल्व्हर्टच्या अप्रोच रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
, “महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न माझ्या निदर्शनास आणून दिला होता. मी हा विषय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर मांडला. त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले.या निर्णयामुळे संपूर्ण मतदार संघा तील रस्ते सुरळीत आणि सुरक्षित होणार आहेत अशी माहितीही आमदार अमोल खताळ यांनी दिली.