संगमनेर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी

वारकरी सेवाभावी मंडळ व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वारकरी मंच आणि जय हिंद युवा मंच संचलित श्री सोमेश्वर पायी दिंडी चे गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले असून यात तालुक्तातील हजारो भाविक सहभागी झाले असल्याची माहिती दिंडी संयोजक ह भ प जालिंदर ढोकरट यांनी दिली आहे.


        याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सेवाभावी मंडळ, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वारकरी मंच आणि जय हिंद युवा मंच संचलित सोमेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे हे 11 वे  वर्ष असून हि दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरकडे गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी निघाली आहे.  सर्वजण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात. या दिंडीच्या माध्यमातून एकत्र आलेले सर्व भाविक परस्परांशी बंधू भावाने वागतात. यातून एक वेगळीच अलौकिक अध्यात्मिक ऊर्जा मिळते.   

या दिंडीत संगमनेर ,संगमनेर खुर्द ,रायते ,वाघापूर , राहणे मळा, ढोले मळा, सुकेवाडी, कासारवाडी मंगळापुर ,खांडगाव, झोळे, गणेश वाडी ,कोल्हेवाडी, निंबाळे, समनापुर कनोली ,तळेगाव, वडझरी ,हिवरगाव सावरगाव तळ आदी गावांसह तालुक्यातील  वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
ही दिंडी मार्गदर्शक ह.भ.प. अमृत महाराज जोशी, ह.भ.प. एस. झेड. देशमुख, ह.भ.प. वाळीबा महाराज भागवत, दिंडी संयोजक तथा अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर ढोकरट, ह.भ.प. भाऊसाहेब मुंडे व सेक्रेटरी माणिकराव पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *