संगमनेर – पंचायत समिती जवळील गुंजाळ मळा परिसरात ट्रक टर्मिनस सुरू करण्यासाठी नगरपरिषदेनेमध्ये मार्च 2024 मध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. यासाठी राज्यांना देणाऱ्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निधी मिळाला आणि यातून हे काम सुरू झाले. नवीन लोकप्रतिनिधींनी अगोदर हे काम कोणी केले, जमीन देण्यासाठी स्थानिकांची कशी मदत झाली ,कोणी निधीसाठी पाठपुरावा केला, काम कधीचे याबाबतची पूर्ण माहिती घ्यावी, साहेब ज्याच्या कामाचे श्रेय त्यालाच द्या दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा आहे , आधी माहिती घ्या आणि मग श्रेय घ्या असे शुभम गुंजाळ व राहुल गुंजाळ यांनी म्हटले आहे.

गुंजाळ मळा परिसरातील शेतकरी व नागरिकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमच्या परिसरातील ट्रक टर्मिनसची पाहणी नवीन लोकप्रतिनिधी व महायुतीच्या काही कार्यकर्त्यांनी केली. खरेतर नवीन लोकप्रतिनिधीने अगोदर हे काम कधीचे, निधी कोणी मिळवला, काम कधी सुरू झाले याची माहिती घेणे गरजेचे होते..
संगमनेर शहरांमध्ये वाहनांची जास्त संख्या आहे. यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात असून पार्किंग करता नगरपालिकेने पंचायत समिती परिसरातील जागा सुचवली. याकरता आम्ही गुंजाळ बंधूंनी जमिनी दिल्या. येथे रिझर्वेशन होते. स्थानिकांनी मदत केली. नगरपालिकेने भांडवली गुंतवणुकीतील राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून भाग- 6 नागरी सुविधा योजनेअंतर्गत या परिसरामध्ये ट्रक टर्मिनस उभा करण्याकरता जावक क्रमांक बांधकाम- 14/126/2024 – दिनांक 15 मार्च 2024 रोजी नुसार 16 मार्च 2024 रोजी या कामाची निविदा संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. या मोठ्या कामाकरता निधी गरजेचा होता. मग 5 कोटी 84 लाख रुपये हा निधी मिळावा याकरता शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा कोणी केला. याबाबतची सविस्तर माहिती नवीन लोकप्रतिनिधी यांनी अगोदर घेतली पाहिजे. तसे वाटल्यास त्यांनी याकामाबाबत तत्कालीत मुख्याधिकारी राहुल वाघ यांना फोन करून विचारून घ्यावे, टेंडर कधी निघाले, निधीसाठी पाठपुरावा कोणी केला अशी पूर्ण माहिती घेतल्यानंतर श्रेय घेण्यासाठीचा प्रयत्न करावा.
- खरे तर साहेब दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा आहे, असा सवाल करताना ज्याच्या कामाचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे.
कोणत्याही कामाची माहिती न घेता राजकीय हेतू ठेवून ज्यांचा संबंध नाही अशा पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन येथे येऊन फोटोसेशन करणे ,बातम्या देणे, सोशल मीडियावर प्रसिद्धी करणे हे आम्हाला अत्यंत वाटते असे गुंजाळ मळा परिसरातील नागरिक व महिलांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.