मी शिर्डी मतदार संघाचा मतदार असून संगमनेर प्रमाणे स्वातंत्र्याचे व आनंदाचे वातावरण राहता तालुक्यात निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत .राहता तालुक्यातील जनतेला गुलामगिरी व दहशतुतून मुक्त करण्यासाठी ही लढाई असल्याने यामध्ये सर्व जनतेने सहभागी होऊन सौ प्रतिभाताई घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन करताना आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक सभा परिवर्तनाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
आश्वी खुर्द येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ प्रभावती ताई घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, डॉ जयश्रीताई थोरात, शिवसेनेचे सचिन कोते, बापूसाहेब भवर, तात्यासाहेब गायकवाड ,मिलिंद कानवडे, सचिन चौगुले, सोनल जगताप, सौ प्रतिभा जोंधळे, ॲड रामदास शेजुळ ,अर्चना भूसाळ, नामदेव शिंदे, प्रमोद बोंद्रे ,रामनाथ तांबे, दिपाली वर्पे, गणपतराव सांगळे, विक्रम थोरात, राजेंद्र चकोर, अशोक वाणी ,अशोक जोशी, विवेक तांबे ,गणेश जोरी आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की, मागील साठ वर्ष खासदार, आमदार ,मंत्री, जिल्हा परिषद अशी विविध पदे तुमच्याकडे होती. मात्र तरीही तुम्हाला एमआयडीसी करता आली नाही .आणि मृत्यूचा सापळा असलेला नगर मनमाड रस्ताही झाला नाही.

राहता तालुक्यात दहशतीचे व सुडाचे राजकारण असून पिण्याच्या पाण्यात सुद्धा राजकारण करतात इतकी नतदृष्ट लोकप्रतिनिधी येथे आहे. वाळूचे धोरण फसले आहे. तलाठी भरती मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. गोरगरिबांच्या अन्नात माती कालवण्याचे काम या मंडळीने केले असून निवडणुकीसाठी तरुणांना वाईट वळणाला लावले जात आहे.
संगमनेर तालुका हा सुसंस्कृत आणि शांततेच्या तालुका म्हणून ओळखला जातो .तेथील घडी विस्कळीत करण्यासाठी हे काम करतात. माझे आव्हान आहे की खुली चर्चा होऊन जाऊ द्या. संगमनेर आणि राहत्याची प्रत्येक क्षेत्रात तुलना करा. दहशतीचे आजादी हे घोषवाक्य घेऊन सर्वांनी एकजुटीने व मत विभाजन टाळत सौ. प्रभावती काकी घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
तर सौ.प्रभावती घोगरे म्हणाल्या की, निवडणुका आल्या की सत्ताधारी अगदी डांबरी रस्त्यावर सुद्धा मुरूम टाकतात. कुटील आणि कारस्थाने असे राहत्यातील विखे घराणे आहे. आमदार थोरात यांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. महाविकास आघाडीची समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी साधी गृहिणी असून राहता तालुक्यातील दहशतवाद संपवण्यासाठी मी जनतेच्या पाठबळावर उभी असून सर्वांनी मोलाची साथ द्या असे आव्हान त्यांनी केले.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की ,मी न्याय मागायला गेले आणि माझ्यावरच केसेस टाकल्या. जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस टाकल्या. हा कुठला सत्तेचा गैरवापर आहे. सत्ता येते आणि जाते मात्र जनता आपली असते. 28 गावे जसे आमदार निवडून आणू शकतात तसे आमदार पाडू शकतात. यावेळेस सर्वांनी दहशतीतून मुक्तीसाठी सौ प्रभावती काकी घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले.
तर बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, चंद्रभान घोगरे आणि शंकर नाना खर्डे यांचा मोठा वारसा प्रभावती घोगरे यांना लाभला आहे. आमदार बाळासाहेब थोरात, शरदचंद्रजी पवार ,उद्धवजी ठाकरे प्रभावती ताई घोगरे यांच्या पाठीशी उभे आहे. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने की अनेक प्रलोभने दाखवतील मात्र त्याला बळी न पडता सर्वांनी स्वातंत्र्याच्या लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.