भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु तर रंधा फॉल सुरु झाल्याने पर्यटकांना पर्वणी

भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून आज रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7441दलघफू (67.41%) झाल्याने रंधा फॉल सुरु झाला असुन पर्यटकांना पर्वणी सुरु झाली आहे.


भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे. जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरीता भंडारदरा धरणातुन विदयुतगृह मधून 845 क्युसेक्स तर स्पील वे गेट मधून 1058 क्युसेस ने पाणी सोडण्यात आले असून एकूण 1903 क्युसेस पाणी धरणातून विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. 15 जुलैपर्यंत 65% लेव्हल कायम ठेवण्यात येणार आहे. असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले.


मागील दोन दिवस या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले होते. पंधरा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडीप देणार, असे वाटत आहे असतानाच सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर कमी जास्त होत असून गत २४ तासात भंडारदरा 30 येथे मिमी, घाटघर 74 मिमी, तर रतनवाडी येथे 66 मिमी, पांजरे येथे 58 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. तर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.


धरणातून पाणी सोडल्याने रंधा धबधबा प्रथमच वाहता झाला असल्यामुळे पर्यटकांना आनंद होत आहे. तसेच भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होत असून सध्या निळवंडे धरणातून शेती आवर्तनासाठी 900 क्युसेस ने विसर्ग चालू आहे. त्यामुळे प्रवरा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढते आहे. आढळा नदीवरील देवठाण धरण भरले असून आढळा नदी पात्रात पण पाण्याची पातळी वाढली असून हे पाणी प्रवरा नदीला मिळणार आहे.


मुळा परिसरात पावसाची तांडव वाढल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. मुळा धरणात चांगला पाणी साठा होत आहे. मात्र आदिवासी भागात भात खाचरे भरले असलेने रोपे पाणी खाली गेल्याने अवनीस उशिर होत आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. रोपे जर गेली तर भात लागवड होणार कसा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *