संगमनेरमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त साई मंदिरात श्री साई चरित्र पारायण व पालखी सोहळा संपन्न

संगमनेर – दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वाच्या निमित्ताने संगमनेर येथील साई मंदिरात श्री साई चरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलं. या वेळी साई परिवाराचे सदस्य सुरेश कlमयुर काका व असंख्य साई भक्त उपस्थित होते.

या पारायण सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे साईबाबांच्या पालखीबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात लोकमान्य टिळक आणि साईबाबांची ऐतिहासिक भेट झाल्यानंतर टिळकांनी बाबांना दिलेला शेला, साईभक्त पिंगळे बाबा यांच्या माध्यमातून संगमनेरच्या साई मंदिरात आणण्यात आला होता तो आजही साई मंदिरात आहे. दरवर्षीप्रमाणे या पवित्र शेल्याची साईबाबांच्या पालखीबरोबर ‘गुरु भेट’ म्हणून श्री स्वामी समर्थ केंद्रात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. यावेळी स्वामी भक्त व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पहाटे साई मंदिरात रुद्राभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली. या गुरु शिष्य स्नेहबंधनाच्या सोहळ्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्रातील प्रमुख सेवेकरी मोतीभाऊ झंवर, नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या सोहळ्याने संगमनेर नगरीत अध्यात्मिक उर्जा आणि गुरु-शिष्य परंपरा सांगणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता भक्तीमय वातावरणात झाली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *